नागपंचमी-शुभेच्छा-9

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:58:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नागपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपचंमी शुभेच्छा. 

चल गं सखे वारूळाला, वारूळाला, वारूळाला,
नागोबा पूजायाला, पूजायाला, पूजायाला...
नागपंचमीच्या शुभेच्छा

शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी,
आज तुझा सण आला आहे नागपंचमी
नागपंचमीच्या शुभेच्छा

सर श्रावणाची सांगे, गोज गुपित कानात
झुला फांदीवरचा गं, श्रावणाचे गातो गीत
नागपंचमीच्या शुभेच्छा

निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला,
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला
नागपंचमीच्या  हार्दिक शुभेच्छा

जपायला हवं नागाच्या अस्तित्वाला
नको केवळ आंधळी पूजा
नाग दूध पित नाही कधीच
देऊ नका त्याला नाहक सजा
नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा

मातीच्या नागाची पूजा करा
जिवंत नागाचा नको अट्टाहास
तुमच्या अंधश्रद्धेमुळे होतो
नागाचा अन्नवयीत छळ आणि र्हास
नागपंचमीच्या शुभेच्छा

निसर्गाच्या बांधीलकीतून निर्माण झाला नागपंचमीचा सण,
शेतकरी आपल्या मित्राचे उतरवतो त्या निमित्ताने ऋण...
नागपंचमीच्या शुभेच्छा

समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती...
नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीच्या अमृततुल्य शुभेच्छा
पुंगीने नागाची आज मुलाखत घ्यावी,
जनतेच्या वाट्याची खावी दूध मलाई,
फणा अंहकाराचा डसता बाधा होई,
पुंगीच्या अंगागाची होई लाही लाही
नागपंमीच्या शुभेच्छा

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेब दुनिया.कॉम)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================