पाऊस सुंदरी कविता-एका सुंदरीच्या मी शोधात आहे, ती पावसात कुठेतरी भिजत आहे

Started by Atul Kaviraje, August 22, 2023, 10:14:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसात भिजत असलेली सुंदरीची कविता-गीत ऐकवितो. "तरम पम तरम पम, तरम पम, चलो  उसको  ढुढेंगे हम"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही सतत पाऊस पडत असलेली, आणि सारी सृष्टी हिरवीगार दिसत असलेली मंगळवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( तरम पम तरम पम, तरम पम, चलो  उसको  ढुढेंगे हम )           
------------------------------------------------------------------

           "एका सुंदरीच्या मी शोधात आहे, ती पावसात कुठेतरी भिजत आहे"
          ----------------------------------------------------------

एका सुंदरीच्या मी शोधात आहे
ती पावसात कुठेतरी भिजत आहे
माझं मन तिच्यापाशी हरवलं आहे,
जेव्हापासून मी तिला भिजताना पाहिलं आहे

एका सुंदरीच्या मी शोधात आहे
ती पावसात कुठेतरी भिजत आहे
रात्रंदिवस तिच्याच स्वप्नात असतो मी,
तिचे भिजलेले चिंब रूप मला मोहवीत आहे

तिला पIहिल्यापासून मी तिचाच झालोय
तिच्या त्या मोहक अदानI मी कधीचI भूललोय
मला भूक नाही, तहानही लागत नाही,
रात्रीची झोप तर मुळीच लागत नाही

त्या पावसाळी ती तिथे एकटीच होती
पाऊस जलबिंदूंचे मुक्त रसपान करीत होती
हस्त ओंजळीतले पावसाचे पाणी मुखावर खेळवीत होती,
आजूबाजूचे भान नसलेली, एक बेखबर अल्लड युवती होती

त्या धारांत तिचे आरस्पानी लावण्य खुलत होते
मुक्त, स्वैर, बेभान अशी ती बिनधास्त भिजत होती
कुणाचीच पर्वा, कुणाचीच भीती जणू तिला नव्हती,
अशी अवचितच ती माझ्या नयनांत भरली होती

पाहता पाहता माझं मन ती चोरून गेली
लाखात एक अशी ती मनाला होती भावली
जणू स्वर्गीय अप्सराच धरेवर होती अवतरली,
पाहताक्षणीच ती माझ्या मनाची राणी झाली

आणि अवचित त्या पर्जन्य जळात ती विरघळून गेली
जणू पावसाच्या धुक्याआड ती हरवून गेली
जाता जाता तिचा मादक गंध ती उधळून गेली,
हतप्रभ मी, जणू माझी नजरबंदीच करुन गेली

आणि तेव्हापासून मी तिच्या शोधात आहे
पावसाच्या जलधारांत ती मला अंधुक दिसत आहे
भिजताना, न्हाताना, मुक्त बागडताना, नाचताना,
हा माझा भासच आहे बहुधा, मी तिच्यासाठी पागल आहे

प्रत्येक सुंदर हसिनांमध्ये मी तिला शोधतोय
पण ती एक वेगळीच सौंदर्याची मूर्ती आहे
तिची नजाकत, तिची अदा काही औरच आहे,
ती एक परी, कदाचित जन्नतची हूरच आहे

ती शिंपल्यातली जणू एक अति चमकदार मोती आहे
ती सुवर्ण अंगठीत जडलेला एक प्रकाशमान नगिना आहे 
तिच्या रूपाचे बखान करण्यास शब्दच नाहीत पुरेसे,
अशी ती लावण्याची देवी, जणू सौंदर्याची खाणंच आहे

अशी ती सौंदर्यवती माझ्यावर सीतम का करतेय ?
माझ्या मनावर कब्जा करून माझ्यावर जुलूम का करतेय ?
त्या पावसात अचानक गायब होण्याचा तीचI अंदाज कोठला ?,
माझी तहान भूक झोप उडवून ती का माझी मजा पाहतेय ?

नाही, मीही नाही असातसा, तिला शोधून काढणार
तिच्यावर प्रेम जडलय माझं, तिला मी माझी करणार
केव्हातरी भिजताना माझ्या नजरेस पडेलच ती,
तू नेहमीच पड पावसा, मी पावसाला करतोय विनंती

कांती जणू दुधाळ, दुधाचा रंग देहाने ल्यालेली
डोळे जणू मादक नशेचा जाम, नजरेनेच प्यालेली
अंगभर चंदनाची उटी पखरीत, मधुर सुरभीत नाहलेली,
ईश्वराचा एक बेहतरीन करिष्मा होऊन पृथ्वीवर अवतरलेली

कोवळ्या कमळाच्या देठ-पुष्पाचा नजाकत भरलेली
गुलाब पुष्पाची कोमलता, मुलायमतI बहुविध रंगात साठलेली
तरुणाईच्या भराने, जवानीच्या रसाने कशी मुसमुसलेली,
मन कसं नाही घसरणार, माझ्या नजरेनेच केली होती चुगली

आणि अशी ती रूपाची परी भुरकन उडून गेली
चंदेरी पंख लावून, अस्मानी हूर दिसेनाशी झाली
मला इथे हुरहूर लावून सूर मारून जणू गायब झाली,
दूरदूरवर काहीच मागमूस न ठेवता जणू हवेत विघटून गेली

आणि तेव्हापासून मी तिला प्रत्येक पावसात शोधतोय
ती पुन्हा इथेच भेटेल, याच आशेवर मी जगतोय
पाऊसच आहे तिचा दूत, तो पडला की मी वेड्यापरी धावतोय,
निदान ती दिसावी म्हणून, कितीतरी वेळ भिजत उभा राहतोय

मित्रानो, एक आर्जव आहे माझी तुमच्यापाशी
कुठे सापडली माझी प्रिया, निरोप द्यावा मजसी
तिच्या शोधात मी हरवून गेलोय, हरपून गेलोय,
तिच्या काळजीने माझी झोपही झालीय नाहीशी

मजवरी तुमचे होतील उपकार फारच
आजवरी सोसलंय माझ्या मनाने दुःख उगाच
ती भेटता माझे जग बदलेल, जगण्याचे कारण मिळेल,
ती मिळतI जीवन बहरेल, जगण्याचा अर्थ कळेल

एका सुंदरीच्या मी शोधात आहे
ती पावसात कुठेतरी भिजत आहे
तिला पाहण्यासाठी जीव तळमळत आहे,
तिच्या दर्शनासाठी नजर तरसत आहे

एका सुंदरीच्या मी शोधात आहे
ती पावसात कुठेतरी भिजत आहे
आजही ती माझ्या स्वप्नात येते नित्य,
तिच्या गोड स्वप्नांनी मला जIग येत आहे

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2023-मंगळवार.
=========================================