तू पुन्हा आलीस

Started by mkapale, August 23, 2023, 10:56:40 AM

Previous topic - Next topic

mkapale

तू पुन्हा आलीस

वर्षांनी इतक्या मला भेटायला आलीस
उशीर झाला का रे? विचारत थबकलीस
मला कळेना मी कसं सांगावं कि
स्वप्नात अशी तू कितीदा समोर दिसलीस

लग्नाच्या एक दिवस आधी देऊन चिठ्ठी
मला झोकून अंधारात तू निघून गेलीस
नकार कळवून मी बोचलेले शब्द गिळले
मी कसा आहे तेही विचारायचं विसरलीस

आपलं स्वप्नं होतं हिरळीतलं सुरेख घर
आज त्या झुल्यावरून तू प्रेमानी पाहिलंस
वाटलं होतं तुला का, कि मी नाही करणार
हसून म्हटलंस, जसं हवं तसं कसं रे बांधलस

तुझी इच्छा मी वचन म्हणून स्वीकारलं
घर मानलं आपलं, जरी तू एकटीनं पाहिलंस
प्रेमाची परीक्षा मी न सांगता देत राहिलो
उशिरा का होईना तू मला आपलं मानलस

विचारायचे होते अनेक प्रश्न तुला, पण
निर्धार तुझा असा कि हो म्हणून घेतलंस
वाट पाहून थकलेले डोळे , मन , काया
वेदना , जखमा सगळं क्षणात मिटवलंस
.
.
.
.
.
दूर तिने जाऊ नये वाटत असेल तर
इच्छा तिच्या आपल्या मानून ठरवलंस
तुझा निर्धार देईल तिला आधार, जर
नातं दूर जाईल, हे तिला समजावलंस