पावसाची एक सुंदर प्रेम कविता-पाऊस बरसतोय रिमझिम पिया, मिलनास तरसतोय माझा जिया

Started by Atul Kaviraje, August 24, 2023, 11:00:50 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची एक सुंदर प्रेम कविता-गीत ऐकवितो. "पिया सावन रिमझिम बरसे, जिया तेरे मिलन को तरसे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही पाऊस नसलेली आणि प्रखर चमकदार ऊन पडलेली, गुरुवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( पिया सावन रिमझिम बरसे, जिया तेरे मिलन को तरसे )           
----------------------------------------------------------------

             "पाऊस बरसतोय रिमझिम पिया, मिलनास तरसतोय माझा जिया"
            --------------------------------------------------------

पाऊस बरसतोय रिमझिम पिया
मिलनास तरसतोय माझा जिया
मंद सुस्वरात जणू गातोय पडताना,
रोम रोम मोहरतोय स्पर्श देहात भिनताना

पाऊस बरसतोय रिमझिम पिया
मिलनास तरसतोय माझा जिया
त्याच्या पडण्यात जणू संगीत आहे दैवी,
प्रीत उमंग, भरतोय तो मनात नवी

तनूवर पहा कसे माझ्या रोमांच फुलताहेत
पावसाचे गIर जल-बिंदू मला काट्याप्रमाणे बोचताहेत
शहIरI देत अंगी गIर वIरI कसा धसमुसळा बिलगतोय,
अधिक चिंब करण्या जणू तो पावसालI निमंत्रण देतोय

अंग माझे भिजले, मनही माझे भिजले
पिया तुझ्या आठवणींचे रोमांच देही उमलले
पहा, हा पाऊस कसा सतत कोसळतोय,
तुझ्या माझ्या प्रीतीची याद देऊन तो जातोय

प्रियकरI, ये समीप ये, मला या धारांपासून वाचव
लाडक्या, घे जवळ घे, तुझ्या मिठीत मला लपव
हा ऋतू सांगतोय प्रेम कर, साजणाला आपलंस कर,
हा मोसम सांगतोय, प्रीतीत आपले सर्वस्व तू अर्पण कर

पाऊस बरसतोय रिमझिम पिया
मिलनास तरसतोय माझा जिया
पाऊस बरसतोय तरी तृष्णा काही मिटत नाही,
तुझ्याविना पिया माझी प्यास काही बुझत नाही

पाऊस बरसतोय रिमझिम पिया
मिलनास तरसतोय माझा जिया
तू नाहीस, तर हा पाऊस काय कामाचा ?,
तूच तर एक आहेस पिया माझ्या जिवाभावाचा

     तुझ्याप्रमाणे मीही इथे प्यासा आहे, साजणी
     पाऊसही मला चिंब करतोय मनसोक्त, रमणी
     शरीर भिजतंय, मनही भिजतंय, तुझ्या प्रेमात राणी,
     प्रेमाचा मधू रस पाज मला, मी तहानलोय तुझ्या प्रितीला, मधुराणी 

     हा पाऊस मला काही सांगतोय, तो मला समजावतोय
     तुझ्या देहावरले काही थेम्ब चोर, तो मला गर्भित इशारा देतोय
     तुझ्या मनाची तहान त्यानेच तर भागेल, मिश्कीलपणे तो वदतोय,
     हे गुपित सांगता सांगता मग त्याचा जोर अधिकच वाढतोय

हे  शीत तुषार पहा माझे अंग अंग जIळताहेत
या जलधारा, गIर गIर गारI माझा देह पोळताहेत
गात्रागात्रांत माझ्या अग्नीचा तप्त लोळ कसा वाहतोय,
हा पाऊस फक्त पडतोय, की शरीराचा तोल बिघडवतोय

हा पाऊस खरं बोलतोय, प्रियकरI, तू संभ्रमात नको पडूस
हे थेम्ब जणू शबनम बिंदूच आहेत, ते तू नकोस नुसते कुरुवाळूस
थरथरत्या देहावरल्या ओघळत्या थेंबांना तू स्पर्शाने थांबवं,
गालावरल्या टपटपत्या जलबिंदूना तू अधराने टिपवं 

ही माझी आग तुझ्या स्पर्शानेच विझेल, साजणा
तुझ्या गाढ कवेतच तिचे निरसन होईल, प्रियकरI
हा पाऊस काय पडतच राहील, मनIस जाचत राहील,
तुझ्या स्पर्शातच ती जादू आहे, जीवास शांत करील

पाऊस बरसतोय रिमझिम पिया
मिलनास तरसतोय माझा जिया
आता विलंब नको, दूर नको राहूस,
मिठीत घे मला, पहIत नको राहूस

पाऊस बरसतोय रिमझिम पिया
मिलनास तरसतोय माझा जिया
माझं मन तळमळतंय, तुझ्या भेटीस तरसतंय,
माझ्या जवळ राहा, तुझं सान्निध्य मन शांत करतंय 

     पहा, प्रिये हा मोसमही पागल होऊ लागलाय
     पहा, प्रिये पडतI पडतI त्याचाही तोल ढळू लागलाय
     त्याची गत बहुधा माझ्यासारखीच झाली असावी,
     त्यालाही तुझी ही अदा मनापासून आवडली असावी

     तुला पाहता मी बेधुंद होतोय, माझा होशच हरवतोय
     तुझे चिंब शरीर, तुझा ओलेता देह मला आसक्त करतोय
     असं वाटतंय, तुझा तारुण्य जणू एक आगीचा गोळा आहे,
     कधी शबनम आहे, तर कधी तो शोला आहे

     माझ्या हृदयातील धडधड आता माझ्याशी बोलते आहे
     बोलता बोलता तीचं स्पंदन हळू हळू वाढते आहे
     ही धडकनही बहुधा त्या पावसाप्रमाणे दिवाणी होत आहे,
     तुला जवळ घेण्याची तीव्र इच्छा मला होत आहे

     माझी सुध बुध, माझी चैन, अIराम साराच हरवून गेलाय
     माझी बुद्धी-विवेक, माझ अस्तित्त्व सारच हरपून गेलय
     बस मला आता फक्त तुझीच ओढ आहे, लाडके,
     तू आज मला जरा जास्तच गोड दिसत आहेस, प्रिये

तन बदन जळतंय, दोन्हीकडे आग बरोबर लागलीय, प्रिया
नजरेतून प्रेम ओघळतंय, घे मिठीत घट्ट घे मला, सखया
माझ्या देहाची खुशबू तुझ्या श्वासात सामावून घे,
माझ्या शरीराचा सुगंध तुझ्या गात्रागात्रात भिनवून घे

आज नजर मदहोश होतेय, नशेत वहIत जातेय
न पिताही मद्याचा प्याला, प्रेमाची झिंग चढत जातेय
पावसाच्या प्रत्येक थेंबागणिक ती देहात प्रवाहित होतेय,
ही तुझी प्रणयोत्सुक प्रेमिका, आज तुला देह समर्पीत करतेय

हेच ते आपल्या दोघांचे मधुर मिलन, याची मिठास औरच आहे
ज्यासाठी तरसत होते आपले तन मन, हे काही खासच आहे
शेवटी ती वेळ अIली, तुझ्या मिठीसाठी माझी कायI सरसावली,
पावसानेही लाजून जलबिंदूच्या छत्रीत आपली मिठी लपवली

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.08.2023-गुरुवार.
=========================================