पावसाची प्रेम कविता-पावसाचा हा मस्त महिना, प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना

Started by Atul Kaviraje, August 25, 2023, 10:34:24 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेमात पIडणाऱ्या पावसाची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "मस्त महीना बड़ा कमीना, रिम झिम है बरसात"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही काळ्या ढगांनी आभाळ झाकोळलेली, मंद पवन वाहत असलेली, पण पाऊस नसलेली, शुक्रवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( मस्त महीना बड़ा कमीना, रिम झिम है बरसात )           
----------------------------------------------------------

                "पावसाचा हा मस्त महिना, प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना"
               ----------------------------------------------------

पावसाचा हा मस्त महिना
प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना
मिठी मिठी चूभन देत हा पडणारा पाऊस,
एकमेकांच्या नजरेत बांधतोय आपल्या दोघांना

पावसाचा हा मस्त महिना
प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना
चिंब चिंब मुक्त भिजवीत हा पाऊस,
एकेमकांच्या मिठीत सामावतोय आपल्या दोघांना

आपल्या जलधारांतून तो संगीत ऐकवतोय
बरसत्या, कोसळत्या जळातून तो गीत गातोय
तनक धिन धा, जादुई सुरIत तो आपल्याला अडकवतोय,
हा मस्त, मदमस्त महिना आपल्याला मोहात पडतोय

त्याचा रिम झिम सूर दशदिशात पसरतोय
त्याचा झिम झिम स्वर दIही दिशात सूर मारतोय
प्रेमात पIडणारIच हा ऋतू आहे प्रेमी जनांचा,
आपल्या जलबिंदू बाणांनी प्रेमी जीवIनI तो घायाळ करतोय

मोहिनी घालणारा, भूल देणारा, मनIस बद्ध करणारा
हा एकच एक तर मोसम आहे, पावसाचा
प्रीती संगम घडवणारा, मनाचे मनाशी नाते जोडणारा,
हा एकच एक तर ऋतू आहे, पर्जन्याचा

पावसाचा हा मस्त महिना
प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना
प्रेमाची रुजुवात तो चिंब भिजवून करतोय,
एकमेकांची ओढ लावतोय तो आपल्या दोघांना

पावसाचा हा मस्त महिना
प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना
पावसाविना प्रेमात मजा नाही, गम्मत नाही,
पडून ती मजा लुटू देतोय तो आपल्या दोघांना

अश्या या रिपरिप रिमझिम पावसात मी तुला कशी सोडेन
आता तर सुरुवात झालीय पावसाला, मी तुला कशी जाऊ देईन
हा पाऊस दिवाना करतोय, मला तो पागल करतोय जणू,
माझ्या शृंगाराचा विचका जरी झाला, तरी मी बेभान नाचत राहीन

ये साजणा जवळ ये, मला घट्ट मिठीत घे, सामावून घे
ये प्रियकरI समीप ये, तनामनाचे आज मिलन होऊ दे
मला या कंकणांची आता नाही पर्वा, जरी त्या खनकल्या,
मला या ओष्ठ लालींचीही नाही तमI, जरी जातील त्या पुसल्या 

तुझ्या प्रेमास मी झालेय अधीर, सुटत चाललाय आता माझा धीर
या पावसानेच केल्या आहेत माझ्या सर्व सर्व भावना बधिर
ये माझ्यावर प्रेम कर, तुझ्या प्रीतीत मला आकंठ न्हाऊ दे,
या पावसातच उभे आहोत आपण दोघे, पाऊस असाच पडत राहू दे

पावसाचा हा मस्त महिना
प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना
तुजवीण मी, मजवीण तू नाही राहू शकत,
पावसात ही प्रीत डसलीय आपल्या दोघांना

पावसाचा हा मस्त महिना
प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना
या पावसातच सापडलाय याचा उतारा,
पाऊस अमृत-जल पIजतोय आपल्या दोघांना

ही काही वल्गना नाही, मी खरंच सांगतेय, प्रियकरI
हा काही अफसाना नाही, ही गोष्ट खरंच घडतेय, लाडक्या
इश्क मध्ये मी विद्ध झालेय, तुझ्या प्रीतीत मी बद्ध झालेय,
या प्रेम-रोगाचा तूच आहेस वैद्य, तुझ्याच औषधांनी गुण येईल, साजणा

तूच आहेस माझा हमजोली, तुझ्या प्रीतीत मी आहे नखशिखांत बुडाली
तूच आहेस माझा जिवलग, तुझ्या नजरेच्या बाणांनी मी घायाळ झाली
तूच माझा यार, तूच माझा दिलदार, तूच माझं प्यार, तुझं प्रेम आहे वफादार,
माझं तन बदन बघ कसं होरपळतंय, अंगाची माझ्या होतेय काहिली

हा पाऊस पडतोय कसा धुवाधार, ना त्याला रोक, पडतोय नुसता संततधार
प्रेमाची नशI पसरलीय तनुभर, रोमांच उभे राहताहेत साऱ्या देहभर वारंवार   
आता मनानेही सोडलीय लाज, प्रीत सागरी डुंबू पाहतय, हवाय त्याला आधार,
तुझं माझं मिलन हाच एक उपाय, पिया आता मिलनास उशीर नको लावूस फार

पावसाचा हा मस्त महिना
प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना
चल सारी तोडून बंधने पुढे जाऊया,
पाऊस प्रेम बंधनात अडकवतोय आपल्या दोघांना

पावसाचा हा मस्त महिना
प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना
या पावसामुळे प्रेमाचा खरा अर्थ कळलाय,
पडतI पडतI खूप शिकवलंय त्याने आपल्या दोघांना

हा पाऊस मज बेचैन करून गेलाय, बेताब करून गेलाय
माझ्या अंगांगात, गात्रागात्रात बेहिशोबी प्रीत भरून गेलाय
हा प्रीतीचा रांजण काठोकाठ भरून वाहतोय, मला बेलगाम करतोय,
माझी शुद्धच हरपतेय, ही प्रीत-नशI मला बेशुद्ध करतेय, बेबस करतेय

या कलिकेचे आज कुसुम होतेय, मधुर सुवासाने दरवळतेय
या युवतीचे आज तारुण्य बहरतेय, मधू गंधित दूरवर पसरतेय
या मधू फुलाचा मधू रस प्राषीणया, प्रियकरI मधुकर होऊन कधी येशील,
हा पुष्प-मकरंद काय कामाचा, जिथे भवऱ्याची भिरभिर भ्रमंतीच नसेल

आता शीघ्र ये, ही दुरी दूर कर, माझ्या भांगेत सिंदूर भर, पिया
आता देरी नको, दूर दूर राहू नको, माझ्या माथ्याचे अवघ्राण कर, प्रियकरI
गालावर माझ्या गुलाब फ़ुललेत, तुझ्या चुंबनाने ते अधिकच उमलतील,
तुझा अंगुली-स्पर्श माझ्या ओठांवरला, दंत कुंदकळ्यांना विलग करील 

पावसाचा हा मस्त महिना
प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना
वदतोय, एकमेकांविना जन्म आहे अधुराच,
सांगतोय, जन्मोजन्मीचे साथीदार व्हा, आपल्या दोघांना

पावसाचा हा मस्त महिना
प्रेमात पIडतोय आपल्या दोघांना
जलबिंदूंचा सेहरा बांधून मंगलाष्टक गातोय हा पाऊस,
माथ्यावर बरसून आशीर्वाद देतोय तो आपल्या दोघांना 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.08.2023-शुक्रवार.
=========================================