पावसाची छान प्रेम कविता-पडणाऱ्या पावसाने संदेश दिलाय, जगण्याचा मार्ग मला सापडलाय

Started by Atul Kaviraje, August 26, 2023, 10:57:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची एक छान प्रेम कविता-गीत ऐकवितो. "बरसते पानी का मज़ा कुछ और होगा, ज़िंदगी का मज़ा कुछ और होगा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही काल  रात्रभर पाऊस पडून गेलेली, सुंदर, रम्य आणि थंड हवेची शनिवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( बरसते पानी का मज़ा कुछ और होगा, ज़िंदगी का मज़ा कुछ और होगा )           
-------------------------------------------------------------------------

            "पडणाऱ्या पावसाने संदेश दिलाय, जगण्याचा मार्ग मला सापडलाय"
           ----------------------------------------------------------

पडणाऱ्या पावसाने संदेश दिलाय
जगण्याचा मार्ग मला सापडलाय
पडतI पडतI तो काहीतरी शिकवून गेलाय,
अतिमोलाचा धडा तो गिरवून गेलाय

पडणाऱ्या पावसाने संदेश दिलाय
जगण्याचा मार्ग मला सापडलाय
पडणाऱ्या पावसाने उपदेश दिलाय,
जीवनाचा खरा अर्थ मला कळलाय

आजवर तोच तोचपणा होता आयुष्यात
निरस, कंटाळवाणे, नव्हता उत्साह जीवनात
याच पावसाने पडून मला इशारा केलाय,
नवीन जीवन जगण्यास एक सहारा दिलाय

तेव्हाही उधाण होत, उत्साह होता, आनंदाचा मेळाच जणू भरायचा
तेव्हाही उमंग होती, उन्माद होता, जीवनझरा भरभरून वाहायचा
पण यात काही मजा नव्हती, एकल्या जीवाला चैन नव्हती,
जीवन जगण्यात गम्मत नव्हती, एकटेपणाच्या दुःखाला सीमा नव्हती

बाग बहरIयची, बाग सळसळायची, बाग आनंदाने डोलायची
फुले उमलायची, फुलायची, फुले हसायची, आपला सुवास दूरदूर पसरवायची
पण माझ्या जीवनातली तनहाई, निघून जायचं काही नावं नाही घ्यायची,
माझ्या वाटेवरचा मी एकटाच राही, पावले भलतीकडेच भरकटत चालायची

जेव्हापासून तू आलीस माझ्या जीवनात
आता जीवन जगण्यास खरी मजा येतेय
या रुक्ष, उजाड, विराण माझ्या जीवनात,
तुझ्या पावलांनी चालत नवं जीवन येतेय

पण आता सIर सIर माझ्या मनाप्रमाणे होऊ लागलय
माझ्या तनहाईने माझा अंतिम निरोप घेतलाय
आता मन माझं प्यास नाहीय, त्याची तृष्णा भागत गेलीय,
दुसरं तिसरं नाही कुणी सखे, तुझ्या आगमनाची चाहूल लागलीय

आता या पावसात भिजायला खूपच मजा येतेय
सोबत तू असतI, ती मजा आणखीनच वाढत जातेय
आज तू माझ्या सोबत आहेस, तू माझ्याबरोबर आहेस,
तुझा हात माझ्या हाती आहे, तुझ्याकडूनच मला जगण्याची उमेद मिळतेय

पडणाऱ्या पावसाने संदेश दिलाय
जगण्याचा मार्ग मला सापडलाय
तू तीच तर होतीस प्रिये, रोज माझ्या स्वप्नात येणारी,
आज हाच पाऊस तुझा हमराज झालाय

पडणाऱ्या पावसाने संदेश दिलाय
जगण्याचा मार्ग मला सापडलाय
हा पाऊस आहे मनकवडा, आहे बोलघेवडा,
पडतI पडतI प्रीतीचा मार्ग सुचवून गेलाय

या मनाची हाक ऐकून तू आलीस, त्याला साद दिलीस
इतक्या दिवसांची माझ्या मनाची पोकळी तू भरून काढलीस
पाहता पाहता माझी झालीस, माझ्या हृदयात तू वसलीस,
मला कधीच सोडून जाऊ नकोस, सखे, माझी तनहाई तू दूर केलीस

आता या हृदयाची तूच मालकीण आहेस, माझं मन तुझंच आहे
तू भेटल्यापासून मी माझाच नाही राहिलो, मी बेभान झालो आहे
विसरू म्हटलं तरी आता नाही विसरत येत, हे प्रेमचं असं आहे,
विरहाची तर गोष्टच सोड राणी, ते आपल्या नशिबी नकोच आहे

तुझ्या याच अदेवर मी फिदा झालोय, मी तुझा बंदI झालोय
तू माझी राधा, सखये, मी तुझा मुरलीवाला कृष्ण कन्हैया झालोय
ये आज प्रीतीत रंग भर, या पावसात आपण प्रीतीची रंगपंचमी खेळू,
पाऊसही करतोय जलधारांची लयलूट, प्रेमाचा गंध लागलाय दरवळू 

हा तुझा हात असाच हाती राहावा, आपल्या प्रीतीला आधार मिळावा
तुझी साथ मला हवीय राणी जीवनभर, तुझा सहवास आयुष्यभर रहावा
माझ्या आयुष्याचे सोने झालेय, तू माझ्या जीवनात आल्यापासून,
साऱ्याचा गोष्टी मला आवडू लागल्यात, तू माझी झाल्यापासून

आज मला मुक्त नाचू दे, बागडू दे, हसू दे, खेळू दे या पावसात
आज मी खूप खुश आहे, मला गाऊ दे, मला न्हाऊ दे, या पावसात
माझी प्रिया आज माझ्याबरोबर आहे, चिंब भिजतेय माझ्यासवे या पावसात,
हे क्षण असेच राहू देत, वेळ इथेच थांबू दे, काळ इथेच थिजू दे, या पावसात

तू मला मिळालीस, प्रिये, मला सर्वस्व मिळालं, सर्व काही गवसलं
ते ते सर्व काही प्राप्त झालं, हरवलेलं सापडलं, जे मी होत गमावलं
माझं सुख, चैन, अIराम मला लाभला, जेव्हापासून दुःख दूर झालं,
तुझ्या असण्याने, तुझ्या अस्तित्त्वाने, तुझ्या संगतीने, माझं जीवन उदात्त झालं

पडणाऱ्या पावसाने संदेश दिलाय
जगण्याचा मार्ग मला सापडलाय
पावसाचे मी मानलेत आभार मनापासून,
प्रीतीचा पैगाम तो घेऊन आलाय

पडणाऱ्या पावसाने संदेश दिलाय
जगण्याचा मार्ग मला सापडलाय
माझी प्रियतमा मला मिळालीय, मला प्रेम मिळालंय,
तेव्हापासून पाऊस माझा जिवलग मित्र झालाय

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.08.2023-शनिवार.
=========================================