धर्मवीर आनंद दिघे साहेब पुण्यतिथी-लेख-2

Started by Atul Kaviraje, August 26, 2023, 09:59:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "धर्मवीर आनंद दिघे साहेब पुण्यतिथी"
                           ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०८.२०२३-शनिवार आहे. आज "धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी" आहे. मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे लवकरच हा पक्ष लोकांच्या पसंतीस उतरला. बाळासाहेब म्हणत शिवसेना सांभाळली ती सामान्य कार्यकर्त्यांनी. सामान्य कार्यकर्ता हाच शिवसेनचा कणा राहिला आहे. आणि याच कार्यकर्त्यांपैकी एक होते आनंद दिघे. वाचूया, साहेबांवर एक महत्त्वाचा लेख.

     एकदा कामानिमित्त जात असतांना त्यांच्या जीपचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना सिंघानिया इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृतीही चिंताजनक होती. अनेक नेत्यांसह ठाण्यातील शिसैनिकांनी इस्पितळात गर्दी केली होती. कार्यकर्त्यांना त्यांना पाहता यावं अशा पद्धतीने त्यांचा बेड लावण्यात आला होता.

     त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका येवून २६ ऑगस्ट २००१ रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली पण हि बातमी कार्यकर्त्यांना सांगण्याची हिम्मत कुणात होत नव्हती शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले कि, 'आनंद दिघे आपल्यातून निघून गेले' आणि शिवसैनिक सैर भैर झाले.

     त्यांचा विश्वासच बसेना कि, धर्मवीर आपल्यातून गेले म्हनुन. रुग्णालयावर शंका उपस्थित करून त्यांनी सिंघानिया इस्पितळाला आग लावली.

     आनंद दिघेंची राजकीय कारकीर्द बहरत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

     मात्र त्यांचा सामान्य कार्यकर्ता ते धर्मवीर हा प्रवास शिवसैनिक कधीच विसरू शकणार नाही एवढं मात्र नक्की..!

         धर्मवीर आनंद दिघे बद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – FAQ About Anand Dighe--

प्र. १. आनंद दिघे यांचा जन्म केव्हा झाला?
उ. आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला.

प्र. २. आनंद दिघे कोणत्या पक्षाशी संबधित होते?
उ. आनंद दिघे शिवसेना पक्षाशी संबंधित होते.

प्र. ३. आनंद दिघेंना लोकांनी काय उपाधी दिली होती?
उ. आनंद दिघेंना लोकांनी धर्मवीर हि उपाधी दिली होती.

प्र. ४. आनंद दिघेंचा मृत्यू केव्हा झाला?
उ. २६ ऑगस्ट २००१ रोजी ठाणे येथे झाला.

प्र. ५. आनंद दिघेंच्या जीवनावर येऊ घातलेल्या चित्रपटाचे नाव?
उ. 'धर्मवीर' हे नाव आनंद दिघेंच्या जीवनावर येऊ घातलेल्या चित्रपटाचे नाव आहे.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मIझीमराठी.कॉम)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.08.2023-शनिवार.
=========================================