धर्मवीर आनंद दिघे साहेब पुण्यतिथी-लेख-4

Started by Atul Kaviraje, August 26, 2023, 10:02:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "धर्मवीर आनंद दिघे साहेब पुण्यतिथी"
                           ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०८.२०२३-शनिवार आहे. आज "धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी" आहे. मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे लवकरच हा पक्ष लोकांच्या पसंतीस उतरला. बाळासाहेब म्हणत शिवसेना सांभाळली ती सामान्य कार्यकर्त्यांनी. सामान्य कार्यकर्ता हाच शिवसेनचा कणा राहिला आहे. आणि याच कार्यकर्त्यांपैकी एक होते आनंद दिघे. वाचूया, साहेबांवर एक महत्त्वाचा लेख.

   आनंद दिघेंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच काय वक्तव्य केलं आहे ?--

     आम्ही दोघंही धर्मवीर या आनंद दिघेंवर आधारित असलेल्या सिनेमांत आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत आम्ही कामही केलं आहे. दिघेसाहेबांना सगळा महाराष्ट्र ओळखतो. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार तळागाळात पोहचवण्याचं काम आनंद दिघे यांनी केलं. त्यासाठी रात्रीचा दिवस केला. पायाला भिंगरी लावून त्या माणसाने शिवसेना वाढवली. शहरी भाग, आदिवासी वस्त्या, पाडे या ठिकाणी शिवसेना पोहचवली." असे एकनाथ शिंदे म्हणाले.
 
     "आनंद दिघेंनी वयाची ५० वर्षेही पूर्ण केली नव्हती तेव्हा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना माझ्या आयुष्यातलीही दुःखद घटना आहे. एका दिवसात दोन दिवसाचं काम करणारे आनंद दिघे होते. याचा साक्षीदार मी तर आहेच पण माझ्यासारखे अनेक लोक आहेत. शिवसेना आणि ठाणे म्हटलं की आनंद दिघे यांचं काम समोर यायचं. बाळासाहेब ठाकरेंनाही हेवा वाटावा असं काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केलं."

     मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा बोलेन.ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यादिवशी या राज्यात आणि देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही." असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जुलैला केलं आहे.

             आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला ?--

     आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिली होती. ते म्हणाले होते की आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत विविध चर्चा सुरू असतात. गणपतीचे दिवस होते. त्या दिवसात त्यांचा १९ ऑगस्टला अपघात झाला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात नेलं असता तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आहे. अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली असंही शिंदे यांनी सांगितलं होतं. असं सगळं असलं तरीही आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा घडतातच. खासकरून तो अपघात होता की घातपात ही चर्चा आजही रंगताना दिसते आहे.

--BY-मुंबई तक
--------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मुंबई तक.इन)
                          --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.08.2023-शनिवार.
=========================================