धर्मवीर आनंद दिघे साहेब पुण्यतिथी-चारोळी

Started by Atul Kaviraje, August 26, 2023, 10:05:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "धर्मवीर आनंद दिघे साहेब पुण्यतिथी"
                           ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०८.२०२३-शनिवार आहे. आज "धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी" आहे. मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे लवकरच हा पक्ष लोकांच्या पसंतीस उतरला. बाळासाहेब म्हणत शिवसेना सांभाळली ती सामान्य कार्यकर्त्यांनी. सामान्य कार्यकर्ता हाच शिवसेनचा कणा राहिला आहे. आणि याच कार्यकर्त्यांपैकी एक होते आनंद दिघे. वाचूया, साहेबांवर एक चारोळी.

        आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली चारोळी--

     ठाणे-आज धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त महाराष्ट्रभरात त्यांच्या पूज्य स्मृतीला अभिवादन केले जात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांना अभिवादन केले आहे.

     आपल्या प्रत्येक भाषणात आणि ठिकठिकाणी एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या नावाचा उल्लेख करतात. ते अभिमानाने आपण त्यांच्या तालमीत तयार झाल्याचे सांगतात.

     आज त्यांनी ट्विटरवर चार ओळी पोस्ट करत, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. धर्मवीर गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन अशा शीर्षकाखाली त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे.

                 उरात भरुनी सदैव आपले स्मरण,

                 मनामध्ये कोरली आहे कायम आपली शिकवण,

                 करीतो गुरुवर्य आपल्या तत्वांचे आचरण,

                 जनसेवेचे व्रत महत्वाचे, नाही राजकारण.

     अशी पोस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली आहे. आजच्या दिवशी आनंद दिघे हे महाराष्ट्राल सोडून गेले होते. त्यांनी ठाण्यात शिवसेना रुजवली आणि मोठी केली होती.

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र केसरी.इन)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.08.2023-शनिवार.   
=========================================