आनंद दिघे साहेब पुण्यतिथी-गीत-2-ठाणे जिल्ह्यानं,ढाण्यावाघानं,कशी शिवसेना वाढवली

Started by Atul Kaviraje, August 26, 2023, 10:11:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                          "धर्मवीर आनंद दिघे साहेब पुण्यतिथी"
                         ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.०८.२०२३-शनिवार आहे. आज "धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची पुण्यतिथी" आहे. मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे लवकरच हा पक्ष लोकांच्या पसंतीस उतरला. बाळासाहेब म्हणत शिवसेना सांभाळली ती सामान्य कार्यकर्त्यांनी. सामान्य कार्यकर्ता हाच शिवसेनचा कणा राहिला आहे. आणि याच कार्यकर्त्यांपैकी एक होते आनंद दिघे. वाचूया, साहेबांवर सुप्रसिद्ध कवींनी रचलेली आणि आपल्या मधुर आवाजात गायकांनी गायिलेली काही गाणी.

                "ठाणे  जिल्ह्यानं, ढाण्या  वाघानं, कशी  शिवसेना  वाढवली"
               ----------------------------------------------------
 
धर्मवीर  दिघे  साहेबानी  किमया  घडवली
धर्मवीर  दिघे  साहेबानी  किमया  घडवली

ठाणे  जिल्ह्यानं   ढाण्या  वाघानं  कशी  शिवसेना  वाढवली
ठाणे  जिल्ह्यानं   ढाण्या  वाघानं  कशी  शिवसेना  वाढवली

होता  शिवसेनेचा  नायक 
झाला  जनतेचा  तो  सेवक
न्याय  द्यायचा  तो  गरिबाला
होता  जनतेचा  रखवाला 

बाळासाहेबांचा   आदर्श  घेऊन  क्रांती  घडवली
बाळासाहेबांचा   आदर्श  घेऊन  क्रांती  घडवली

ठाणे  जिल्ह्यानं   ढाण्या  वाघानं  कशी  शिवसेना  वाढवली
ठाणे  जिल्ह्यानं   ढाण्या  वाघानं  कशी  शिवसेना  वाढवली

ठाणे  जिल्ह्यात  दिघे  साहेबाना
नेहमी  मिळायचा  मIन  सन्मान
धर्मवीर  ते  दिघे  साहेब
झाले  शिवसेनेची  शान

जनतेच्या  त्या  मनी  साहेबानी  शिवसेना  घडवली
जनतेच्या  त्या  मनी  साहेबानी  शिवसेना  घडवली

ठाणे  जिल्ह्यानं   ढाण्या  वाघानं  कशी  शिवसेना  वाढवली
ठाणे  जिल्ह्यानं   ढाण्या  वाघानं  कशी  शिवसेना  वाढवली

--संगीतकIर आणि गायक-ज्ञानेश्वर म्हात्रे
----------------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-यू ट्यूब.कॉम)
                       --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.08.2023-शनिवार.   
=========================================