प्रियकर-प्रेयसीची प्रेम कविता-तुझ्या नजरेने जादूच केलीय,माझी नजरच बांधून टाकली-A

Started by Atul Kaviraje, August 27, 2023, 10:22:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातील, एकमेकांवर उत्कट प्रेम करणारी प्रियकर-प्रेयसीची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "देखा तेरी मस्त निगाहों में, नशा है अदा है मोहब्बत है हो"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही 
काल रात्रभर संततधार पडत असलेली, आणि आजही सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असलेली, हवेत गारवा आलेली आणि मन प्रसन्न करणारी, रविवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( देखा तेरी मस्त निगाहों में, नशा है अदा है मोहब्बत है हो )           
-------------------------------------------------------------------

                "तुझ्या नजरेने जादूच केलीय, माझी नजरच बांधून टाकलीय"
               ----------------------------------------------------

तुझ्या नजरेने जादूच केलीय
माझी नजरच बांधून टाकलीय
माझ्यावर तू काय मोहिनी टाकलीस,
जणू माझी नजरबंदीच झालीय

तुझ्या नजरेने जादूच केलीय
माझी नजरच बांधून टाकलीय
जादूगारच आहेत तुझे नयन प्रिये,
पाहता पाहता माझ्या नजरेत प्रीत भरलीय 

काय नाही तुझ्या नजरेत, लाडके
एका अख्य्ख्या बाटलीचीच नशI आहे
एक अनोखी अदाच भरलीय तुझ्या डोळ्यांत,
त्यामुळेच तर माझी ही आज दशा आहे

काय नाही तुझ्या नजरेत, प्रिये
प्रेम भरलंय काठोकाठ, प्रीत वाहतेय आटोकाट 
कोणासाठी तरी दिसून येतेय मोहब्बत,
नैन तुझे नाही ना करणार बगावत ?

ये प्रिये, ये माझ्या बाहुपाशात ये
ये सखये, मला दृढ आलिंगन दे
आज मला राहवत नाहीय, मन बेभान आहे,
गजब आहे तुझं रूप, जणू कयामतच आहे 

तुला पाहूनच माझी धडधड वाढते आहे
हे धडकते स्पंदन मला सांगते आहे
लाडके, तू मला इतके प्रेम दे,
तुझ्या प्रेमात मला वाहूनच जाऊ दे

तुझ्या नजरेने जादूच केलीय
माझी नजरच बांधून टाकलीय
तुझी प्रीत स्पष्ट दिसून येतेय डोळ्यांतून,
माझ्या मनाने ती चांगलीच ओळखलीय

तुझ्या नजरेने जादूच केलीय
माझी नजरच बांधून टाकलीय
मी माझ्या होशमध्ये नाही आज,
माझी मतीच तू गुंग करून टाकलीय

तुझे हे हुस्न, तुझे हे रूप
तुझी हि कांती, तुझे हे सुस्वरूप
एक अजब मदहोशी मला घेरून टाकतेय,
एक अनोखी मस्ती माझ्या अंगांगांत भरतेय

न बोलताच सर्व काही कळून येतंय
या खामोशीतच सर्व काही समजून चुकतंय
जणू काही ही खामोशी गात आहे,
तुझ्या माझ्या प्रेमाचे गुज सांगत आहे

तुझी झुल्फे, तुझे हे मोकळे केस
वाऱ्यावर मुक्त लहरताहेत, उडताहेत
एक मादक सुगंध ते पसरवताहेत,
गात्रागात्रात भिनून मनाचे द्वार ते उघडाताहेत

तुझ्या सौंदर्याचे मी कसं करू वर्णन ?
तुझ्या रूपाचे मी कसं करू बखान ?
तूच माझी तिलोत्तमा, तूच माझी प्रियतमा,
तुझी माझी आहेस राणी, तूच माझी जIन

तुझ्या नजरेने जादूच केलीय
माझी नजरच बांधून टाकलीय
कूस बदलतोय मी इथून तिथे,
निज नाही रात्रभर, अवचित पहाट झालीय

तुझ्या नजरेने जादूच केलीय
माझी नजरच बांधून टाकलीय
माझं अस्तीत्व तू हिरावून घेतलंस,
माझी सत्त्वपरीक्षाच जणू तू पाहिलीय

     प्रिया, तुझी नजरही आहे तोबा
     अवचितच घेतलाय त्याने मनाचा ताबा
     तुझ्या नजरेला नजर दिल्यापासून,
     मी माझीच नाही राहिले, दिलरुबा

     आपल्या प्रेमाला कोणाची नजर लागो ना
     कुणी आपली चुगली तर नाही करणार ना ?
     आता विरहाच्या नावाने मन घाबरतं,
     आपले प्रेम कायम असंच राहील ना ?

     तुझा एकच स्पर्श आणि मी मोहरून गेले
     तुझी एकच नजर आणि मी शहारून गेले
     काहीतरी आहे तुझ्यात, प्रियकरI,
     तुझ्या प्रेमात मी नकळत ओढले गेले

     असं अति प्रेमाने मजकडे नको पाहूस
     भावनोत्कट नजरेने मला आमंत्रण नको देउस 
     माझे पाऊल मग डगमगू लागते,
     अंगात एक मIदकशी शिरशिरी येते

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.08.2023-रविवार.
=========================================