प्रियकर-प्रेयसीची प्रेम कविता-तुझ्या नजरेने जादूच केलीय,माझी नजरच बांधून टाकली-B

Started by Atul Kaviraje, August 27, 2023, 10:24:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसातील, एकमेकांवर उत्कट प्रेम करणारी प्रियकर-प्रेयसीची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "देखा तेरी मस्त निगाहों में, नशा है अदा है मोहब्बत है हो"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही 
काल रात्रभर संततधार पडत असलेली, आणि आजही सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असलेली, हवेत गारवा आलेली आणि मन प्रसन्न करणारी, रविवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( देखा तेरी मस्त निगाहों में, नशा है अदा है मोहब्बत है हो )           
-------------------------------------------------------------------

                 "तुझ्या नजरेने जादूच केलीय, माझी नजरच बांधून टाकलीय"
                ----------------------------------------------------

     तुझ्या नजरेने जादूच केलीय
     माझी नजरच बांधून टाकलीय
     डोळ्यांतूनच समजतेय प्रीतीची भाषा,
     तुझ्या प्रेमाची जाणीव मला झालीय

     तुझ्या नजरेने जादूच केलीय
     माझी नजरच बांधून टाकलीय
     सख्या, इतके प्रेम करतोस माझ्यावर,
     ही सखी आज तुझीच झालीय

     तुझ्या नजरेत आज अजब अशी शोखी आहे
     तुझ्या नजरेत आज गजब अशी शरारत आहे
     ही शोखी, शरारत मला आवडते आहे,
     आज तुझं हे अनोखे वागणेही मला भावते आहे

     तुझ्या मिठीत मी कशी येऊ, लज्जा येत आहे
     तुझ्या नजरेला मी कशी नजर देऊ, शरम येत आहे
     पण आज तुझ्या प्रेमात मी पागल झाले आहे,
     आज सर्व लज्जा, शरम सोडून मी तुझ्याकडे आले आहे

     आज तू प्रेमाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्यास
     आज तू प्रीतीच्या सर्व हद्द पार केल्यास
     साजणा, काय झालंय काय तुला आज ?,
     इतकं प्रेम नको करुस, सनम, मला वाटतेय लाज

     कसाही असलास तरी तू मला आवडतोस
     तुझ्या लIघवी बोलण्याने तू मला आपलंस करतोस
     असाच रहा माझ्याबरोबर, माझा होऊन रहा,
     सारं काही सोडलंय तुझ्या प्रेमासाठी, माझ्या डोळ्यांत पहा 

     तुझ्या नजरेने जादूच केलीय
     माझी नजरच बांधून टाकलीय
     माझ्या आयुष्यात तू आल्यापासून, जिवलगI,
     माझी सारी उदासी दूर झालीय

     तुझ्या नजरेने जादूच केलीय
     माझी नजरच बांधून टाकलीय
     माझ्या मनाने तुला वरलंय, सख्या,
     तुझ्या माझ्या प्रेमाची जीत झालीय

     बघ हा पडणारा पाऊस काय सांगतोय ?
     ऐक, हा प्रेमाचा ऋतू काय बोलतोय ?
     बिनधास्त प्रेम करा, प्रेमात वाहून जा,
     कुणीही तुमच्या प्रेमाआड नाही येणार, प्रेमाची घ्या मजा 

     आता आपल्या मनाला तू जरा समजवं
     समाजाचही जरा तू भान ठेव
     प्रेमात थोडीशी दुरी असलेली बरी,
     थोडंसं प्रेम उद्यासाठीही बाकी ठेव

     तुझ्या बोलण्यातही काही कमी जादू नाही
     तुझ्या प्रेमाच्या गोष्टी मला भुलवून टाकत राही
     आपसूकच माझे नयन झुकू लागलेत,
     तुझ्या नजरेला ते नजर द्यायला टाळू लागलेत

     आता पुरे झालं, त्या पावसानेही आता जोर धरलाय
     आता अति झालं, त्या वाऱ्यानेही आता शोर सुरु केलाय
     पाहता पाहता वादळ येईल, तुफानाला होईल सुरवात,
     या प्रत्येक पावसातच आपल्या प्रेमाची होतेय रुजुवात

     तुझ्या नजरेने जादूच केलीय
     माझी नजरच बांधून टाकलीय
     या प्रेमाने आता सारी बंधने तोडलीत,
     तुझ्या माझ्या नात्यात एक अनोखी गोडी आलीय

     तुझ्या नजरेने जादूच केलीय
     माझी नजरच बांधून टाकलीय
     असाच प्रेम करत रहा तू माझ्यावर आयुष्यभर,
     तुझ्यावरून सारी कायI कुरवंडी केलीय 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.08.2023-रविवार.
=========================================