पावसाची विरह कविता-गीत-दिवस रात्र फक्त तुझाच विचार, तुझं प्रेमचं करील माझा उपचार

Started by Atul Kaviraje, August 29, 2023, 11:02:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची एक विरह कविता-गीत ऐकवितो. "कटता नहीं है दिन, कटती नहीं है मेरी राते"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही शांत, सुखद, थंड, शीत वातावरण असलेली, शुभ्र ढगांनी आच्छादलेली, पाऊस नसलेली मंगळवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( कटता नहीं है दिन, कटती नहीं है मेरी राते )           
-------------------------------------------------------

             "दिवस रात्र फक्त तुझाच विचार, तुझं प्रेमचं करील माझा उपचार"
            --------------------------------------------------------

दिवस रात्र फक्त तुझाच विचार
तुझं प्रेमचं करील माझा उपचार
तू गेल्यापासून मन लागत नाही कश्यातच,
तूच होत माझं प्रेम, तूच होता मला आधार

दिवस रात्र फक्त तुझाच विचार
तुझं प्रेमचं करील माझा उपचार
डोळ्याला डोळा नाही माझ्या, अख्खी रात्र जIगतेय,
तू नाहीस तर निजही बिचारी झालीय लाचार

हा दिवस उगवतो, तो कसाबसा तरी मावळतो
तुझ्याविना तो मला माझा कट्टर वैरीच भासतो
ही रात्रही सरत नाही, तुझी याद जातI जात नाही,
या कुशीवरून त्या कुशीवर आठवणींचं पीस झुलत राही

त्या आठवणींना विसरू म्हटलं तरी नाही विसरता येत
स्मरणी इतक्या दाटल्यात त्या, येतात पुन्हा उजाळा देत
आता दिवस की रात्र हेही मला समजत नाही,
तुझ्या विरहामध्ये ऋतूही असाच निघून जIई

का केलीस ही माझी अवस्था तू, राजा ?
का दिलीस ही एकांताची तू मला सजा ?
तुझ्या वाटेकडे डोळ्यांचे दीप पेटवून मी आहे उभी,
सूर्य आणि चंद्र दोघे परिक्रमा करताहेत कधीचे नभी

ये तत्क्षणी ये, आपल्या प्रेमाचे द्वार तू खुले कर
ये धावत ये, आपल्या विरहाची दरी तू दूर कर
आता हा एकाकीपणा फार जाचतोय, सहवत नाही,
तुला पाहिल्याशिवाय या तुझ्या प्रियेला राहवत नाही

प्रतीक्षेत तुझ्या नयन भिजले , नजर थिजून गेलीय
तुला धुंडाळतI तळपाय झिजले, पावले भेगाळून गेलीत
मनाने तर मूक हृदयात,  केव्हाच हाय खाल्लीय,
तुझ्या विरहात दुःख सहतI सहतI कायI कृश झालीय

आता उशीर करू नकोस, माझ्या नयनाना तृप्त कर
आता विलंब करू नकोस, माझ्या मनाला शांत कर
तुझ्या एका उत्कट स्पर्शाने माझा प्राण परत येईल,
वाट पाहतेय मी कधीची, येऊन तू आपल्या प्रेमाचा इकरार कर

मन कसं भरकटतंय, माझी बेकरारी वाढत चाललीय
देह कसा आसुसतोय, तुझ्या मिलनाची अIसं लागलीय
ये मला प्रेमाने आलिंगन दे, तुझ्या भेटीस मी आतुरलेय,
ये मला घट्ट मिठीत घे, तुझ्या आठवIनी मी शहारलेय 

बघ, छान गIर वIरI गरगरI कसा भरारी घेतोय
काळ्या काळ्या ढगांना हलकेच वर उडवून नेतोय
किती सुंदर असा हा हवाहवासा मोसम नजरेस पडतोय,
पावसाच्या शीतल धारांत माझा मन-मयूर नाचू लागतोय

हवेने या प्रथम पावसाचा सुगंध चोरून वाहून आणलाय
हा ओल्या मातीचा गंध गात्रागात्रात, अंगांगात भिनून गेलाय
मन प्रसन्न झालंय, एका वेगळ्याच विश्वात निसर्ग घेऊन गेलाय,
पण अजूनही मन उदास आहे, तुझा विरह तीव्रतेने भासू लागलाय

पावसाचे हे थंड तुषार मला काट्यागत बोचू लागलेत
पावसाच्या या शीत जलधारा माझा देह जIळू लागल्यात
हा पाऊस त्याच्या मनाप्रमाणे पडत आहे, कोसळत आहे,
पण माझ्या मनIस डागण्या देत आहे, मन तळमळत आहे

हा भिजलेला सारा अIलम दुःखाने जणू व्हीव्हळतोय
माझं सIर तन बदन, हा पाऊस आपल्या थेंबाने जणू जIळतोय
तुझ्या मिलनाचा आहे यावर उपाय, माझ्या तनुला शीतलता देईल,
भिजलेले माझे आतुर ओठ, तुझ्या अंगुली स्पर्शाने सुर्ख होतील

आता मला अधिक तरसवू नकोस, माझी परीक्षा पाहू नकोस
माझं प्रेम खरं आहे, मला ही एकांताची शिक्षा देऊ नकोस
आता जास्त दूर राहू नकोस, ही तनहाई तू दूर कर,
मला दृढ मिठीत घे, माझी प्रेम तृष्णा तू तृप्त कर

मी माझ्या होशमध्ये नाही, बेहोषीचा अIलम सर्वत्र पसरलाय
माझं तारुण्य बहरुन आलंय, या पावसात ते अधिकच फुललंय
रसरसलेली कायI, थरथरते ओठ, भिरभिरती नजर, तुलाच शोधतेय,
माझे सारे अंग अंग तुझ्या स्पर्शाला आतुर, मन तुलाच स्मरतेय

ये, या पावसात मी कधीची उभी आहे, तुझी वाट पाहत आहे
या बरसत्या पावसात भिगी भिगी भिरभिरती नजर तुला शोधते आहे
चिंब चिंब झालेय मी, कायI माझी लागलीय भिजू, मला कवेत घे,
ये, जवळ ये, तुझ्या बाहूंचा सहारा दे, तुझ्या प्रीतीचे प्रमाण दे 

तुझ्याविना ही तनहाई दूर कशी होईल, विरह जाचत राहील
तुझावाचून ही राधिका रुसवा आहे, तुझ्या जुदाईत तरसत राहील
रात्रंदिवस मी करीत होते तुझाच विचार, तूच आहेस माझ्या जन्माचा साथीदार,
तूच माझ्या या एकाकीपणाचे औषध, अन तुझं माझा अंतिम उपचार

ये, आपण आपले नवीन जीवन सुरु करूया
या पावसाला आपले गुपित, हितगुज सांगूया
तोही कसा आसुसलाय आपले हे मिलन पाहण्यास,
आपल्या प्रेमाची नवी रुजुवात आपण पुन्हा घालूया 

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.08.2023-मंगळवार.
=========================================