दिन-विशेष-लेख-राष्ट्रीय क्रीडा दिन-A

Started by Atul Kaviraje, August 29, 2023, 05:22:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "दिन-विशेष-लेख"
                                    "राष्ट्रीय क्रीडा दिन"
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-29.08.2023-मंगळवार आहे.  २९ ऑगस्ट-हा दिवस "राष्ट्रीय क्रीडा दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी भारतात साजरा केला जातो. भारतीय हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 1928, 1932 आणि 1936 उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला ऑलिम्पिक सुवर्णपदकांची पहिली हॅट्ट्रिक पूर्ण करण्यात मदत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

     29 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो, आजच्या लेखांमध्ये आपण राष्ट्रीय क्रीडा दिन किंवा राष्ट्रीय क्रीडा दिन/ दिवस मराठी माहिती पाहणार आहोत.rashtriya krida din marathi mahiti  आपणास नक्की वेगळी वाटेल हे नक्की ....

       राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट ला साजरा करण्यामागील कारण| rashtriya krida din 29 august la ka sajra hoto?--

     संपूर्ण भारतभर राष्ट्रीय क्रीडा दिन हा 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो यामागील कारण काय आहे? तर ज्यांना आपण भारतीय हॉकीचा जादूगार म्हणतो असे मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस 29 ऑगस्ट रोजी असल्याने त्यांची आठवण म्हणून हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

          मेजर ध्यानचंद यांचा परिचय | mejor dhyaynchand parichay--

     राष्ट्रीय क्रीडा दिन ज्यांच्या जन्मदिनी साजरा होतो ते म्हणजे मेजर ध्यानचंद या दिनाचे महत्व सजण्यासाठी आपण मेजर ध्यानचंद यांच्या विषयी थोडक्यात माहिती पाहूया.

     मेजर ध्यानचंद यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजेच महाविद्यालयीन शिक्षण शिकत असताना  सर्वप्रथम हॉकीची स्टिक हाती घेतली.त्यांनी अथक  मेहनत घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पंजाब रेजिमेंटमध्ये मेजर ध्यानचंद दाखल झाले. त्यांची लक्षात राहील अशी कामगिरी किंवा ज्यामुळे ते चमकल्यास कामगिरी म्हणजे झेलम या ठिकाणी जो एक हॉकी सामना झाला होता, त्या सामन्यामध्ये आपल्या भारतीय संघाला दोन गोलांनी  विजय मिळवून दिला या कामगीरी पासूनच मेजर ध्यानचंद  नाव चर्चेत राहिले. मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला 1926 रोजी सुरुवात झाली. पुढे त्यांनी  भारतीय संघाचे नेतृत्व म्हणजेच कॅप्टनशिप त्यांच्याकडे होती.  हे नेतृत्व सांभाळत असताना ऑलिंपिक मध्ये तीन सुवर्णपदक मिळवण्याचा मान त्यांच्या नावावर आहे.त्यांच्याविषयी अजून सांगायचे झाले तर त्यांनी बरेचसे योगदान हॉकी खेळासाठी दिले वयाच्या  42व्या वर्षी देखील ते हॉकी अतिशय उत्कृष्टपणे खेळत होते. 1948 रोजी त्यांनी या हॉकी खेळातून निवृत्ती घेतली.rashtriya krida din marathi mahiti ही आपणाजवळ असणे अतिशय गरजेचे आहे कारण अनेकांना हा दिवस 29 ऑगस्ट का?हे माहीत नसते.

--प्रशांत शिपकुले
---------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ज्ञान योगी.कॉम)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.08.2023-मंगळवार.
=========================================