श्वासावर सुंदर प्रेम कविता-आज श्वासात श्वास मिसळू दे, तुझा माझा श्वास एक होऊ दे

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 11:07:52 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, श्वासावर एक सुंदर प्रेम कविता-गीत ऐकवितो. "सास मे 'तेरी सास मिली तो, मुझे सास आई"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही क्षितिज काळ्या ढगांनी आच्छादलेली परंतु पाऊस थांबलेली,                     बुधवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( सास मे 'तेरी सास मिली तो, मुझे सास आई )           
--------------------------------------------------------

               "आज श्वासात श्वास मिसळू दे, तुझा माझा श्वास एक होऊ दे"
              ----------------------------------------------------

आज श्वासात श्वास मिसळू दे
तुझा माझा श्वास एक होऊ दे
जोवर श्वास आहे तोवर आहे धडकन,
तुझी माझी धडकन प्रीतीचे गीत गाऊ दे

आज श्वासात श्वास मिसळू दे
तुझा माझा श्वास एक होऊ दे
प्रत्येक श्वास म्हणजे जीवनाचे प्रतीक,
तुझ्या सहवासात मला जीवन जगू दे

साजणा मी तुझ्या मिठीत आहे, बाहुपाशात आहे
तुझ्या उष्ण श्वासांची परत माझ्या गIली चढते आहे
ही थरथरत्या ओठांची धनुकली तुला आव्हान देतेय,
आनंदी समाधानी मन माझे निश्वासाचा हुंकार देत आहे

जिवलगI, तुझा श्वास माझ्या श्वासात मिसळत आहे
श्वासांची एक सुंदर लय, एक सुरेख स्पंदन अनुभवास येत आहे
आपल्या श्वासांची चढ उतार आपल्या मनातील प्रीत सांगत आहे,
श्वासांचा हा सुरेख एकताल, मनातल्या भावना प्रतीत करीत आहे

     हो प्रिये, तू आलीस, माझ्या जिवात जीव आला
     हो सखे, तू दिसलीस, माझा रोम रोम हर्षलI
     लांबूनच तुझ्या देहाची खुशबू माझ्या श्वासात भिनू लागली,
     निकट येताच, ती माझ्या साऱ्या देहात जणू प्रवाहू लागली

     तुझ्या श्वासाने मला एक नव जीवन दिलय
     तुझ्या श्वासात मिसळून माझा श्वास निवांत झालाय
     हृदयातील धडधड तुझ्या नावाचा जप करीत होती,
     तू मिळताच माझी धडकन बघ कशी शांत झालीय

     माझे आज होषच उडालेत, मी स्वतःला कसा सांभाळू  ?
     तू मला मदहोषच केलय, माझा तोल लागलाय ढळू
     या माझ्या बेभान स्थितीला तूच आहेस जबाबदार, सजणे,
     होश उडताहेत तर उडूदेत, मला हाही अनुभव घेऊ दे, सखये 

     आज माझं पाऊल डगमगतंय, वाकड तिकडं पडतंय
     रस्ता आहे सरळ, पण चालताना पाऊल अडतंय
     सतत तूच दिसत आहेस मला समोर, हे प्रेम मला कुठं नेतय ?,
     तुझ्या प्रीतीत हे मन पागल झालय, कुठे वहIत जातंय ?

     मनात सारखा तुझाच विचार, तुझंच ध्यान असतं
     हे खरं आहे, हे सत्य आहे, हे नेहमीच घडत असतं 
     तू दिसतेस समोर, तरी तू नसतेस, तुझा फक्त भास होतोय,
     जराशी जरी लागता चाहूल, मन तुलाच पहIत असतं 

तुझ्या मिठीत स्वर्ग आहे, साजणा, मला अनुभव घेऊ दे
तुझ्या सान्निध्यात माझं जीवन आहे, प्रिया, मला तुझ्या समीप राहू दे
उत्कट प्रेमाने मला तुझ्या आगोशात घे, दृढ मिठीत घे,
तुझ्या श्वासाची एकतानता, तरलता माझ्या श्वासात उतरू दे

प्रत्येक रात्र माझी अशीच तुझ्या बाहुपाशात जाऊ दे
निज नाहीय डोळ्यांत, या नयनाच्या ज्योतींनी तुला मला ओवाळू दे
याच बेभानावस्थेत रहIता, बघतI बघता पहाट होईल, जिवलगI,
येणारी सकाळ अतिशय समाधानी, शांत, भासू लागेल, प्राणप्रियI

आता प्रत्येक वेळी तुला मी माझ्या समीप पहाते
माझ्या मनाच्या इवलुश्या कप्प्यात तुझी आठवण नेहमीच दाटते
तुझी प्रतिमा नित्य माझ्या डोळ्यांत जणू साठून राहते,
डोळ्यांतले पाणी माझ्या, तुझ्या प्रीतीचे भावनिक प्रमाण देते

तू बोलला नाहीस, तरी तुझ्या स्पर्शाने मला सारं कळतं
निःशब्द तुझ्या ओठांतून हलकेच मधुर प्रीतीचे गाणे दरवळतं
पुनः एकवIर मला स्पर्श कर, तुझा स्पर्श मला अति भावतो,
तुझं मन मी ओळखते, उत्कट स्पर्शातून तुझ्या भIवनI मी जाणते

आज श्वासात श्वास मिसळू दे
तुझा माझा श्वास एक होऊ दे
श्वासाच्या या एकलयीतून नवीन प्रीत फुलू दे,
श्वासाच्या या एकसुरातून नव गाणं जन्मू दे

आज श्वासात श्वास मिसळू दे
तुझा माझा श्वास एक होऊ दे
जीवन मरणात अंतर आहे फक्त एकाच श्वासIच,
आज तुझा श्वास माझं जीवन होऊ दे,
     आज माझा श्वास तुझं जीवन होऊ दे

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================