नारळी पौर्णिमा-निबंध-2

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 02:41:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "नारळी पौर्णिमा"
                                     ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमा निबंध.

               नारळी पौर्णिमा निबंध--

     मित्रांनो नारळी पौर्णिमा हा समुद्र किनारी वास्तव्यास असलेल्या अणि मासेमारी हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारया कोळी समाजातील लोकांचा अत्यंत महत्वाचा सण उत्सव आहे.

              नारळी पौर्णिमा महत्व अणि इतिहास –

     कोळी समाजातील लोकांचा समुद्र अणि मासेमारी याच्याशी खुप घनिष्ठ संबंध असतो.कारण ह्या लोकांचा उदरनिर्वाह करण्याचा मुख्य व्यवसायच समुद्रात जाऊन मासेमारी करणे हा असतो.

     श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा सण कोळी लोक साजरा करत असतात.

     नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व कोळी बांधव समुद्राची पुजा करत असतात.अणि त्याला नारळ देखील अपर्ण करीत असतात.कारण कोळी लोकांचा मासेमारी हा व्यवसाय पुर्णपणे समुद्रावरच अवलंबुन असतो.

     म्हणुन समुद्राची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहावी अणि आपला मासेमारीचा व्यवसाय जोरात चालावा पावसाळयामध्ये समुद्र हा अत्यंत संतापलेला असतो.

     त्यामुळे तो पावसाळयात शिथिल अणि शांत राहावा अणि जहाजाचे नौकेचे बोटीचे नुकसान होऊ नये यासाठी म्हणुन सर्व कोळी बांधव या दिवशी समुद्र देवताकडे प्रार्थना करीत असतात.

     नारळी पौर्णिमेच्या काही दिवस आधीच कोळी बांधव समुद्रात जाऊन मासेमारी करणे बंद ठेवत असतात.ही परंपरा अनेक वर्षापासुन कोळी लोक पाळत आहे.हा सण कोळी समाजात खुप आनंद अणि उत्साहात साजरा केला जात असतो.

     या दिवशी कोळी बांधव पुजेसाठी आपला पारंपारीक पोशाख परीधान करीत असतात.पुरूषांकडुन कमरेला रूमाल बांधला जातो.अंगात टी शर्ट डोक्यावर टोपी घालतात.

     कोळी महिला देखील या दिवशी अंगावर दागदागिने घालतात लुगडे नेसतात.सर्व कोळी बांधव आपल्या पुर्ण कुटुंबासमवेत ह्या सणात सहभागी होत असतात.

     संध्याकाळच्या वेळेला सर्व कोळी बांधव समुद्राची अणि सर्व बोटी जहाज नौका यांची पुजा करीत असतात.बोटींना पताका लावून तसेच रंग देऊन सजवत असतात.अणि मासेमारी करायला समुद्रात सोडल्या जातात.

     सर्व मिळुन समुद्रकिनारी आपल्या पारंपारीक कोळी गाण्यांवर नृत्य करत असतात.

     या दिवशी नारळाला विशेष महत्व दिले जात असते.सर्व नारळापासुन तयार केले जाणारे पदार्थ नारळ भात ओले नारळापासुन बनवलेली करंजी,नारळ पाक यादिवशी बनविले जात असतात.अणि समुद्राला नैवेद्य म्हणुन दाखवले जात असतात.

     याचदिवशी समुद्रास फार जोरात लहरी येत असतात म्हणुनच सर्व कोळी बांधव वरूण देवतेस समुद्र लाटेवर ताब्यात ठेवण्याकरीता सर्व मिळुन आवाहन करत असतात.कारण समुद्रावर वरूण देवतेलाच ताबा मिळवता येतो.

     अIणि जलदेवताला प्रसन्न करायला तिला देखील नारळ अपर्ण केले जाते.

     जुन अणि जुलै महिन्या दरम्यान अत्यंत मुसळधार पाऊस पडत असल्याने समुद्र तर संतप्त असतो शिवाय या काळात माशांचे प्रजनन होत असते म्हणुन कोळी बांधव या कालावधीत मासेमारी करणे बंद ठेवत असतात.

     नारळी पोर्णिमा झाली की मग कोळी बांधव मासेमारीस पुन्हा आरंभ करीत असतात.

     मुंबई येथे अणि मुंबई जवळील ठिकाणी नारळी पौर्णिमेच्या दिवशी ह्या सणाची शोभा निराळीच असते.

     2023 मध्ये नारळी पौर्णिमा ही 30 आँगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे.

--Marathi Mol
----------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-वेब शोध इन मराठी.कॉम)
                  ------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================