नारळी पौर्णिमा-कविता-2-नारळी पौर्णिमा

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 02:44:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "नारळी पौर्णिमा"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमेवर एक कविता.

                                     "नारळी पौर्णिमा"
                                    ----------------

सण राखी पौर्णिमेचा

भावा ओवाळी बहिण

असे ओलावा मायेचा

सुख नयनी वाहिन ।।


आज नारळी पौर्णिमा

सण भाऊ बहिणीचा

बंधूराया ओवाळीते

क्षण अती आनंदाचा ।।


पाठीराखा भाऊ माझा

त्याची वेडी असे माया

किती पडलं संकट

धरी माझ्यावर छाया ।।


मागे बहिण भावाला

ठेव माय बापा सुखी

नको मला साडी चोळी

घाल घास त्यांच्या मुखी ।।


माय बापाहूनी मोठं

नाही जगामध्ये कोणी

होई त्यांचा पाठीराखा

हीच मला ओवाळणी ।।


सण नारळी पौर्णिमा

मोठा मच्छीमारांसाठी

कोळी नारळ वाहून

भरी सागराची ओटी ।।

--विजय सानप
-------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                       -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================