नारळी पौर्णिमा-हार्दिक शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 02:54:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नारळी पौर्णिमा"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

          नारळी पौर्णिमा कोटस अणि शुभेच्छा--

=========================================
1)दर्याचे धन त्याच्या होरीला येऊ दे
माझ्या सर्व कोळी बांधवास सुखाचे आनंदाचे अणि समृदधीचे दिवस येऊ दे
नारळी पौर्णिमेच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा

2) कोळीवाडा सारा सजलाय गो
कोळी यो नाखवा आलाय गो
मासळीचा दुष्काळ संपु दे
दरीयाचे धन तुझ्या होरीस येऊ दे
सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा

3) नारळी पौर्णिमा आपल्या अणि आपल्या परीवाराच्या आयुष्यात आनंद घेऊन यावी
समुद्र देवतेचा शुभाशिर्वाद प्राप्त होऊन तुम्हास सौख्य अणि मांगल्य लाभो
आपणास नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

4) दर्यासागर हाय आपला राजा
त्याचेच जिवावर आपण करताव मज्जा
सगले मिलुन मान देताव दरियाला
नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा

5) मान्सुनची अखेर अणि मासेमारीचा आरंभ सुरू होणार
या नारळी पौर्णिमेच्या दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
आपणास हा दिवस सुख समृदधी अणि शांतीचा जावो

6) सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा
मनी आनंद माव्हना
कोळीयांच्या दुनियेचा
समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

7) आलाय सण महोत्सव नारळी पौर्णिमेचा
हे दर्या सारंगा नमन करीतो आम्ही तुजला
सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा

8) सण आला आहे नारळी पौर्णिमेचा
दर्यापुत्रांच्या हर्ष अणि उल्हासाचा
दर्या राजा आहे देव आमुचा
रक्षणकर्ता आहे तो सकल जनाचा
आपणा सर्वाना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
=========================================

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-वेब शोध इन मराठी.कॉम)
                  -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================