नारळी पौर्णिमा-हार्दिक शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 02:55:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नारळी पौर्णिमा"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

            नारळी पौर्णिमा कोटस अणि शुभेच्छा--

=========================================
9)आला या कोळी बांधवांचा सण
आल या उधाण आनंदास
सगळे कार्यास आरंभ करती
अपर्ण करूनी नारळी समुद्र देवतेला

10) सर्व कोळी बांधवांच्या परंपरेचा,मांगल्याचा,श्रदधेचा
अणि समुद्रदेवतेच्या पुजनाच्या दिनानिमित्त
आपणा सर्वाना खुप खुप शुभेच्छा

11) दर्यावरी आमुचेया डोल होरी
घेऊनिया माशांच्या डोली
अन आम्ही हाय जातीने कोळी
माझ्या सर्व कोळी बांधवास नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

12) कोळी अणि दर्याचे नाते हे भावा बहिणीच्या नात्याप्रमाणेच अतुट आहे.
आपणा सर्वाना रक्षाबंधन अणि नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा

13) नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रास येत असते प्रचंड भरती शांत हो
अशी सर्व कोळी बांधव दर्या राजास प्रार्थना करती
आजच्या दिवशी कोळी बांधव नारळाचे पदार्थ नैवेद्य म्हणुन अपर्ण करती समुद्रास
मग होते मासेमारीच्या व्यवसायाला जोमाने सुरूवात
आपणा सर्वाना नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा

14) हे दर्या माझ्या भावा कृपा कर तुझ्या बहिणीवरी
खवळु नको आम्हावरी
एवढीच कृपा कर आम्हावरी
एवढीच आहे तुझ्या बहिणीची मागणी
नारळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा

15) करीते नारळ अपर्ण माझ्या दर्या राजाला
तोच करील सांभाळ आमुचा सदैव
तोच आहे भाऊ आमचा लाख मोलाचा
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
=========================================

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-वेब शोध इन मराठी.कॉम)
                  -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================