नारळी पौर्णिमा-हार्दिक शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 02:57:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "नारळी पौर्णिमा"
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     नारळी पौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे शेअर करून साजरा करा खास दिवस!

     नारळी पौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे शेअर करून तुम्ही कोळी बांधवांचा हा दिवस आणखी खास करू शकता.
   
     नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण विशेष महत्त्वाचा आहे. हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा नारळी पौर्णिमा हा सण गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील सागरी प्रदेशात हा सण साजरा केला जातो. याला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. हा उत्सव श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो आणि तो पौर्णिमेच्या दिवशी संपतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची देवता वरुण यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. पूजेदरम्यान समुद्र देवाला रक्षासूत्र आणि नारळ अर्पण केले जाते. या दिवशी समुद्रदेवतेची पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात, अशी मान्यता आहे.

     नारळी पौर्णिमेच्या वेळी पूजा करताना नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून केळीच्या पानावर ठेवून छान सजवला जातो. त्यानंतर मिरवणुक काढली जाते. त्यानंतर नारळ समुद्राकडे नेऊन त्याची विधिवत पूजा केली जाते आणि हा नारळ समुद्रदेवतेला अर्पण केला जातो. दक्षिण भारतातील लोक आपापल्या परीने हा सण साजरा करतात.
कोळी बांधवांची परंपरा.

              नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची..
नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा !

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
माझ्या कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
नारळी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!

सण नारली पुनवेचा,
दर्या सारंगा नमन तुजला !
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

कोळी बांधवांचा सण,
उधाण आनंदाला,
कार्यारंभ करती,
अर्पूण नारळ सागराला...
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सण जिव्हाळ्याचा दिवस आज
नारळी पौर्णिमेचा
समस्त कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
=========================================

--सण आणि उत्सव टीम-लेटेस्टली
-----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.लेटेस्टली.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================