नारळी पौर्णिमा-हार्दिक शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 02:59:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "नारळी पौर्णिमा"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना अतिशय पवित्र असतो. यंदा 30 ऑगस्टला नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. समुद्र किनारी राहणारे कोळी बांधव या दिवशी नारळी पार्णिमेचा सण साजरा करात. या दिवसापासून खवळलेला समुद्र शांत होतो अशी श्रद्धा आहे.  या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव पुन्हा मासेमारीला सुरूवात करतात.

     हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना अतिशय पवित्र असतो.यंदा 30 ऑगस्टला नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.त्यानिमित्ताने आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सोशल मीडियावर शुभेच्छा द्या.

     हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना अतिशय पवित्र असतो. यंदा 30 ऑगस्टला नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. समुद्र किनारी राहणारे कोळी बांधव या दिवशी नारळी पार्णिमेचा सण साजरा करतात. या दिवसापासून खवळलेला समुद्र शांत होतो अशी श्रद्धा आहे.  या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधव पुन्हा मासेमारीला सुरूवात करतात. कोळी बांधव समुद्रात होडी घेऊन जातात. समुद्र हे वरुणाचे स्थान असल्याने वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला नारळी पौर्णिमेदिवशी नारळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदूमध्ये प्रथा आहे.

     नारळी पौर्णिमेदिवशी कोळी बांधव समुद्रकिनारी एकत्र गोळा होतात, समुद्राची पूजा करतात. कोळी बांधवांमध्ये या दिवशी नारळ फोडीचा खेळ खेळतात. यामध्ये हातात नारळ घेऊन परस्परांवर आपटून फोडण्याची ही स्पर्धा देखील अनेक कोळीवाड्यांमध्ये रंगते. आज नारळी पौर्णिमा आहे, या मराठमोळ्या सणाचे मराठीतून Facebook, Instagram, WhatsApp, Twitter आणि Social  Media मराठी शुभेच्छा शेअर करा.

            नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
कोळीवारा सारा सजलाय गो,
कोळी यो नाखवा आयलाय गो...
मासळीचा दुष्काळ सरू दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

सन आयलाय गो, आयलाय गो
नारली पुनवेचा..
मनी आनंद मावना,
कोळ्यांच्या दुनियेचा..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

दर्यासागर हाय आमचा राजा
त्याचे जीवावर आम्ही करताव मजा
नारले पुनवेला नारल सोन्याचा
सगले मिलून मान देताव दरियाचा
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

नारळी पौर्णिमेनिमित्त
सागराला श्रीफळ अर्पण करताना
सर्व कोळी बांधवांच्या
समृद्ध जीवनाचा संकल्प करूया..
समस्त कोळी बांधवाना आणि संपूर्ण महाराष्ट्राला
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
=========================================

--तुषार ओव्हाळ
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाइम्स नIऊ मराठी.कॉम)
                  -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================