नारळी पौर्णिमा-हार्दिक शुभेच्छा-7

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 03:00:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "नारळी पौर्णिमा"
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "नारळी पौर्णिमा" आहे. नारळी पौर्णिमा हा हिंदू सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोळी समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो आणि म्हणूनच याला श्रावण पौर्णिमा देखील म्हणतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना नारळी पौर्णिमा सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     श्रावण महिन्यातील पौर्णिमा ( श्रावण पौर्णिमा ) हि कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरी करतात. हा प्रामुख्याने कोळी बांधवांचा सण आहे. भावा बहिणीचे नाते दृढ करण्याचा हा दिवस राखी पौर्णिमा किव्हा रक्षाबंधन म्हणून हि साजरा केला जातो. श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा तसेच सणासुदीचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राची देवता वरुण यास नारळ अर्पण करून समुद्राविषयी आपली कृतघ्न्ता व्यक्त करतात.

           नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
सर्व कोळी बांधवांना
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

कोळी बांधवांची परंपरा,
मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची..
नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा..!!

कोळीवारा सारा सजलाय गो,
कोळी यो नाखवा आयलाय गो...
मासळीचा दुष्काळ सरू दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
माझ्या कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
नारळी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!!

सन आयलाय गो, आयलाय गो
नारली पुनवेचा..
मनी आनंद मावना,
कोळ्यांच्या दुनियेचा..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!
=========================================

--गीता देवरे
-----------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी मराठी sms.कॉम)
                   -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================