रक्षाबंधन-कविता-6-रक्षाबंधन

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:49:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर कविता.   

                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

बरसती जलधारा

आला श्रावणाचा मास.

नागपंचमीचा सण

राखी पुनवेची खास.


बहिणभावाचे प्रेम

दिसे आज राखीतून.

नाते अतूट लाडिक

होई व्यक्त धाग्यातून.


दूरदेशी भाऊराया

कशी बांधू तुज राखी?

पुनवेच्या सणाला गं

आठवण ये सारखी!


नको मज साडी चोळी

नको ती पुरणपोळी.

यश मिळो भावा तुला

हीच आस साधी भोळी.


भाऊराया इथुनच

तुझे औक्षण करिते.

लाभो उदंड आयुष्य

हेचि मागणे मागते.

--शीला अंभुरे
-------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                        -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================