रक्षाबंधन-कविता-15

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:04:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर कविता.   

                      रक्षाबंधन कविता--

भिजुनी रंग प्रेमाचा, शुभ्र आसमंत सजला
          रूप जसे सुंदर आनंदात वाहुनी रंगला

      आस तुझ्या येण्याची, गाठ बांधली प्रेमाने
'घास भरवताना भावाला, गोजिरी लाजली तेजाने

    सुकलेली ही कळी जणु आनंदाने बहरून गेली
    अप्सरा जणु स्वागतासाठी खुशीत नटून बसली

हात तुझा सोबत राहील,
   आधार तुझी आठवण करेल
       स्वप्न पूर्ण करण्यास तुझी, सदैव तत्पर होईल

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी महिला.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================