रक्षाबंधन-हार्दिक शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:19:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर हार्दिक शुभेच्छा.

              रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--राखी... एक प्रेमाचं प्रतिक आहे

राखी... एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ... मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास....

रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी

मी तुला देऊ इच्छितो....

🎁🎊 रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎁🎊


--भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात की "ऊभा"

जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत

आपल्या पाठीशी खंबीरपणे

ऊभा असतो तोच आपला भाऊ..!


--बहीण भावाला,

आई मुलाला,

आत्या भाच्याला,

बायको नवऱ्याला,

मैत्रीण मित्राला,

प्रियसी प्रियकराला,

मित्र मित्राला,

गुरु शिष्याला.

राखी आपण अशा व्यक्तीला बांधतो

ज्याच्याकडून आपल्याला आपली

संकटकाळी नेहमी रक्षा व्हावी हि अपेक्षा असते...


--"औक्षिते प्रेमाने उजळुनी दिपज्योति
रक्षावे मज सदैव अन अशीच फुलावि प्रीती."


--"नात हे प्रेमाचं नितळ अन निखळ
मी सदैव जपलंय हरवलेले ते गोड दिवस
त्यांच्या मधुर आठवणी आज सार सार आठवतंय
हातातल्या राखीसोबत ताई तुझं प्रेम मी साठवलय."


--"आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणार
कुठल्याही संकटात हक्कान तुला हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा धावत येशील
त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा."


--बहीण भावाच्या नात्यावर

सारी दुनिया फिदा आहे..!

ताई दुसरी आई आणि

जगात भारी दादा आहे..!


--पाठराखण तू करशीलंच,

पण मलाही कणखर बनव .

पांचालीचा गोविंद होऊन

भाऊराया हे तेवढं जमव.


--सीमेवर उभा तो

देशासाठी लढतो आहे...

भाऊ माझा कृष्ण

साऱ्यांचे रक्षण करतो आहे..!
=========================================

--अनिकेत
----------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-१०० पोएम्स.इन)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================