रक्षाबंधन-हार्दिक शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:20:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर हार्दिक शुभेच्छा.

            रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--सगळा आनंद

सगळं सौख्य

सगळ्या स्वप्नांची पूर्णता

यशाची सगळी शिखरं

सगळं ऐश्वर्य

हे तुला मिळू दे..

हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे... 🎁


--लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख,
ज्याच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळत खूप


--लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो,
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.

--बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,

बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,

औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,

रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,

बंध असूनही, बंधन हे थोडेच,

या तर हळव्या रेशीम गाठी... 🎁


--सण रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा

सण तुझे- माझे प्रेम व्यक्त करण्याचा

कितीही चुकले तरी मला माफ करुन जवळ

घेणाऱ्या माझ्या भावास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


--लहानपणीच्या राखी मी आजही जपून ठेवल्या आहेत...
या प्रत्येक राखीसोबत तुझी आणि माझी आठवण जोडली आहे.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!


--🎁🎉 बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती....

औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती.....

रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती....

बंधन असूनही, बंधन हे थोडेच,

या तर हळव्या रेशीमगाठी....... ✨ 🎁🎉


--राखीचे नाते लाखमोलाचे

बंधन आहे बहीण भावाचे

नुसता धागा नाही त्यात

भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात

भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात

🎁 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁


--पवित्र प्रेमाचं अतूट नातं,

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


--एक राखी उन वीर शहीदों के लिए भी रख लेना थाली में..

जो खड़े है,

सरहदों पर हमारी रखवाली में।
=========================================

--अनिकेत
----------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-१०० पोएम्स.इन)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================