रक्षाबंधन-हार्दिक शुभेच्छा-9

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:25:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर हार्दिक शुभेच्छा.

          रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--रक्षाबंधनाचा सण आला आहे

चारही बाजूंना आनंदाचा बहर झाला आहे

धाग्यात बांधलेले रक्षासुत्राद्वारे,

बहीण भावाच्या प्रेमात वृद्धी होवो हीच आमची मनोकामना आहे...!

रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा


--प्रेम शोधले नाही मिळाले

परमेश्वर शोधला नाही मिळाला

भाऊ शोधला तर त्यात सर्व मिळाले

प्रिय भावाला रक्षाबंधन च्या शुभेच्छा

रक्षाबंधन शुभेच्छा


--जर मिळाला अजून एक जन्म

तरी हेच भाग्य नशिबी द्यावे ...

कृष्ण सारखा तू भाऊराया

पुन्हा तुझीच बहीण मी व्हावे ...


--किती ही कठोर दिसत असला

तरी मनाने हळवा आहे.

सगळ्यांवर भारी पडेल तो

भाऊ माझा एक्का आहे.

भांडण, रडणं , रुसणं, कट्टी करणं

सगळं माफ आहे ...

कारण बहीण भावाचं नातं

सगळ्यात खास आहे..!


--हे बंध अनोखे असतातच

पण गाठीविनाही घट्ट राहतील.

राखी तर निमित्त असते

त्या पलीकडे हे नाते अतूट राहील .


--आयुष्यात द्रौपदीचं भाग्य मिळालं तर

नशिबी कृष्णासारखा भाऊ असतोच.


--भाऊ आणि बहीणीचे नाते आहे गोड.
हे नाते आहे प्रेमाचे आणि विश्वासाचे.

रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा.


--रक्षाबंधन – विश्वास नात्यांचा.
भाऊ – बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा.

अशा या नाते जपणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा.


--घरची लक्ष्मी ती माझी

गोड बिस्किटाची खारी

निर्मळ बहीण माझी

आहे जगात भारी ..!


--प्रत्येक निर्भीड मुलीसोबत खंबीर भाऊ असतो

आणि प्रत्येक बिनधास्त मुलासोबत

आईसारखे हट्ट पुरवणारी बहीण असते .


--आई वडिलांनंतर मुलीला परीसारखं सांभाळतो
असा एकच राजा असतो तो म्हणजे.. भाऊ !
=========================================

--अनिकेत
----------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-१०० पोएम्स.इन)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================