रक्षाबंधन-कोट्स

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:28:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर कोट्स.

     'ओवाळीते मी भाऊराया.... वेड्या बहिणीची वेडी ही माया'....बहीण-भावाचा सण म्हणजे 'रक्षाबंधन' बहीण भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचे वचन भावाकडे मागते. हा साधासुधा दिसणारा दोरा बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा असतो. श्रावणात रक्षाबंधन हा सण येतो. रक्षाबंधन माहिती सगळ्यांनाच आहे. श्रावण आता अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलाय.यंदा बहिणीला गिफ्टपेक्षाही काही खास द्यायचय का? किंवा बहिणींना भावाला काही खास गिफ्ट द्यायचे आहे का? मग यंदा तुमच्या मनातील भावना त्यांना बोलून दाखवा तेही शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून. आम्ही खास तुमच्यासाठी काही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संदेश, निवडून ठेवले आहेत ते तुम्ही एकमेकांना पाठवू शकता आणि आपल्या भावना व्यक्त करु शकता.

       रक्षाबंधनासाठी काही खास कोट्स (Raksha Bandhan Quotes)--

=========================================
यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही, कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाले म्हणून काय झाले. तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.

आधार तू माझा, मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं, पण तो धाक नाही माझं प्रेम असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख, ज्याच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळत खूप

लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे
यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण

तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढणार नाही, तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.

लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन.. तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतन

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा.. कायम तूच केलीस माझी रक्षा.. आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो. पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================