रक्षाबंधन-भावासाठी खास रक्षाबंधन शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:31:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, भावासाठी खास रक्षाबंधन शुभेच्छा.

    Raksha Bandhan Wishes For Brother | भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा--

     लाडक्या भावासाठी बहिणीचे प्रेम म्हणजे तिची वेडी माया असते. अशा लाडक्या भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा.

=========================================
सण रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा
सण तुझे- माझे प्रेम व्यक्त करण्याचा

नात्याने तू असशील मोठा,
पण तरीही मी आहे तुझी सावली

आयुष्यभर तुला जपण्याचे वचन दिले मी आपल्या माऊली
किती तू खोडकर किती तू प्रेमळ
माझा भाऊराया आहे सगळ्यात सुंदर
लाडक्या भाऊरायाला रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

जन्म झाला तुझा आनंद झाला आम्हा,
तुझ्यामुळे मला मिळाला आनंदाचा वसा,
भावा, तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

भाऊ तू माझा, तुझ्याशिवाय काही सुचत नाही,
बहिणीची वेडी माया काही केल्या कमी होत नाही
कितीही चुकले तरी मला माफ करुन जवळ
घेणाऱ्या माझ्या भावास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन
प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर
आनंद झाला, आजचा दिनू आला,
रक्षाबंधनाला भावाला लुटण्याचा दिवस आला
लग्न झाले तरी तुझ्यापासून मनाने कधीच दूर जाणार नाही,
कोणीही कितीही म्हणाले तरी साथ तुझी कधीही सोडणार नाही
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================