रक्षाबंधन-बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:32:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा.

     Raksha Bandhan Quotes For Sister-बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा--

       रक्षाबंधनासाठी बहिणीला तुम्हाला काही खास पाठवायचे असेल तर तुम्ही बहिणीला आम्ही निवडलेले कोट्स (Raksha Bandhan Quotes For Sister) देखील पाठवू शकता.

=========================================
ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील.. तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.

आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास

यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.

गोंड्याची ना शोभेची मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे

आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.

राखी नाही एक दोरा आहे ते आपले अतुट बंधन.. येतोयस ना दादा...आज आहे रक्षाबंधन

तुझ्या जन्माच्यावेळीच आईने माझ्याकडून घेतले वचन.. आता राखी बांधून करतोय तुझे सगळ्या संकटातून रक्षण

कितीही भांडलीस तरी माझ्या आवडीची राखी आणायला तू कधीच विसरत नाही, वेडी विसरु नकोस तू माझ्यावर नुसत नाही, तर खूप प्रेम करतेस ताई, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

लहानपणीच्या राखी मी आजही जपून ठेवल्या आहेत... या प्रत्येक राखीसोबत तुझी आणि माझी आठवण जोडली आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================