रक्षाबंधन-बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:34:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, बहिणीसाठी रक्षाबंधन शुभेच्छा.

     Happy Raksha Bandhan Wishes For Sister | बहिणीसाठी हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन--

      भावासाठी best quotes on raksha bandhan in marathi मध्ये पाठवले तर त्याला त्याला आनंद मिळणे एकदम साहजिक आहे. खास बहिणीवरील हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी happy raksha bandhan wishes for sister.

=========================================
लाडाची अशी एकच आमची दीदी, ताई तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

तुझी चापट ही मला वाटते आपली, तुझ्याशिवाय घराला घरपण नाही, ताई रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

हाती राखी बांधून माझेच रक्षण करणाऱ्या माझ्या ताईला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

तुझ्या प्रेमाच्या सावलीत दिवस जातात चांगले, ताई तूच ग मला माझी प्रिय सखे

ताईचा रुबाब असतो आमच्या भारी, तिच्यामुळेच मिळते मला भरारी

आठवणींच्या हिंदोळ्यात तू कायम असतेस, तू दूर असलीस तरी जवळ भासते

कितीही बिझी असलो तरी आजचा दिवस खास तुझ्यासाठीच असतो

लहानाची मोठी झालीस, पण तुला माझ्याहून चांगला मित्र मिळणार नाही

माझी ती ताई, आई आणि काही काही, तुझ्या प्रेमाने माझा दिवस जाई

तुझ्यासोबत मला काढायचे आहे आयुष्य, ताई तूच माझ्या जीवनाचा खरा अर्थ
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================