रक्षाबंधन-नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:36:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                        "रक्षाबंधन"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

         Narali Purnima And Raksha Bandhan Wishes-नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा--

       रक्षाबंधनाचा हा दिवस नारळी पौर्णिमा नावाने देखील ओळखला जातो. या दिवशी नारळ वाढवतात. कोळी लोकं हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अशा या खास दिवसासाठी raksha bandhan narali purnima wishes पाठवा.

=========================================
दर्याचे धन होरीला येऊ दे,
आमच्या कोळीबांधवाना चांगले दिवस येऊ दे,
नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

सागराला श्रीफळ अर्पण करताना
सर्व कोळी बांधवाच्या जीवनाचा संकल्प करुया,
नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

समस्त कोळीबांधवाना ,
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

दर्यासागर राजा आहे आमचा,
त्याच्या जीवावर आम्ही करितो मजा,
नारळी पुनवेला नारळ सोन्याचा,
सगळे मिळवून देऊ मान दर्याला,
नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

सागराची गाज,
रुपेरी वाळूचा साज,
कोळीबांधवाना नारळी पौर्णिमेचा शुभेच्छा

सण जिव्हाळ्याचा, सण नारळी पौर्णिमेचा
कोळीवारा सगळा सजलाय गो,
कोळी ये नाखवा आयला गो,
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

सागराची पूजा म्हणजेच वरुदेवतेची पूजा,
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

समुद्राला वंदन,
सन्मानपूर्वक नारळ अर्पण,
नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा

समुद्राच्या नारळ नाही तुझ्याशिवाय लाखमोलाचा,
तूच माझा पिता होऊनी, ओवाळीतो साऱ्या सृष्टीला,
नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================