रक्षाबंधन-मेसेज

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:42:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन मराठी मेसेज.

           Raksha Bandhan Marathi SMS-रक्षाबंधन मराठी मेसेज--

      रक्षाबंधनासाठी तुम्ही काही खास मेसेजसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला किंवा बहिणीला पाठवू शकता. त्यासाठीच आम्ही काही खास मेसेज (Raksha Bandhan Marathi SMS) निवडले आहेत ते देखील तुम्ही एकमेकांना पाठवू शकता.

=========================================
आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते. नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.

ज्याला बहीण असते त्याला कशाचीच भिण्याची कधीच गरज नसते

ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो माझ्या ताईला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय, हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय

तुला त्रास द्यायला येतोय गं... तुझा लाडका भाऊ

कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण एकमेकांचे मित्र असतो. पण ते खरेच आहे कारण भांडण फक्त दिखावा असतो.

ती फक्त बहीण असते जी आईने घराबाहेर काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते.

ताई.. कधीही न थकता माझं किती ऐकून घेतेस. का इतकं प्रेम करतेस

आईने दिला जन्म.. पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी.. काही तरी केले होते पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई

बहीण हे असं रसायन आहे जे कोणाला कळत नाही. पण तिच्याशिवाय राहवतही नाही
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================