रक्षाबंधन-स्टेटस

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:44:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन स्टेटस.

                 Raksha Bandhan Status-रक्षाबंधन स्टेटस--

       तुम्ही बहिणीला किंवा भावाला भेटायला जाणे शक्य नसेल तर तुम्ही स्टेटस (Raksha Bandhan Status ) ठेवूनही तुम्ही तुमच्या मनातील भावना एकमेकांपर्यंत पोहोचवू शकता.

=========================================
ताई आणि आईमध्ये फरक काहीच नाही, दोघी तितक्याच नि:स्वार्थपणे प्रेम करतात.

दादा तुला कधीच सोडणार नाही. पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच कोणाला घेऊ देणार नाही.

आई-वडिलांचा मार नको असेल तर घरात एकतरी बहीण हवीच

लहान बहिणीसारखी चांगली गोष्ट आयुष्यात असू शकत नाही. बहिणी तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

दादा म्हणून बोलावणाऱ्या बहिणीशिवाय गोड कोणीच नाही.

कितीही मोठी झाली तरी प्रत्येक भावाला बहीण असते लहान तिला दरडावताना कितीही त्रास झाला तरी दादा केवढा आणतो तो आव

आयुष्यात कायम हवी फक्त एकाचीच साथ तो आहे माझा भाऊराया खास

दादा आहेस तू माझा,मी तुझी ताई... आला रक्षाबंधनाचा सण आता तरी दे ना काही

येते येते म्हणून किती वाट पाहायला लावतेस. तुला भेटण्यासाठी मला रक्षाबंधनाचीच का वाट पाहायला लावतेस.

बहीण+आई= सुखी आयुष्य
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================