रक्षाबंधन-भावनिक शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:50:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन साठी भावनिक शुभेच्छा.

        Raksha Bandhan Emotional Quotes-रक्षाबंधन साठी भावनिक शुभेच्छा--

        बहीण- भावाचे नाते जितके खोडकर तितकेच ते भावनिक असते. भाऊ एक दिवस आला नाही तरी त्याची वाट पाहात बसणाऱ्या बहिणी आणि कितीही कृश असला तरी बहिणीचे रक्षण करणारा भाऊ असे नाते काही केल्या बदलता येत नाही. अशा या खास नात्यासाठी रक्षाबंधन साठी भावनिक शुभेच्छा.

=========================================
दिवस हा सोनियाचा आला,
तू नाहीस आता पण तुझ्या आठवणींचा पूर आला,
दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही म्हातारे झालो तरी साथ कधी सोडायची नाही, महापूरातही एकमेकांना घेतल्याशिवाय जायचे नाही

काय रे किती बदललास, ताईला तुझ्या तू विसरुन गेलास
ताई, का गं तू लग्न करुन गेलीस, मला घरात एकटी करुन गेलीस
तुझ्या आठवणींचे काय सांगू ताई, उठता बसता येते... ये ना गं लवकर
तू सांगशील तिथे यायला मी तयार आहे, फक्त तुझ्या एका थापेची मला आस आहे
दादा, का रे तू आता येत नाहीस, मला रक्षाबंधनाचे वचन देत नाहीस
ताई, तुझ्या जीवनात जीजूरुपी आनंद आला म्हणून मला विसरु नकोस
निसर्गाने केली आपली ताटातूट, पण तू दूर जाऊ नकोस, मला विसरु नकोस
नशिबी आले असे जगणे, पण तुझे माझे प्रेम आहे या समाजाहून अधिक जुने
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================