रक्षाबंधन-कविता-19

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:53:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर कविता.

                Raksha Bandhan Poems-रक्षाबंधन कविता--

       रक्षाबंधनाच्या दिवशी खास कवितांचा पाऊस भावंडांवर करायचा असेल तर त्यासाठी आम्ही काही निवडक कविता निवडल्या आहेत. चला जाणून घेऊया Raksha Bandhan Poem.

रक्षेचे बंधन देऊन तू झालास
माझा भाऊ,
रक्ताचे नाते नसले ,
म्हणून काय झाले तूच आहेस,
माझा लाडका भाऊ
थोडी लढणारी थोडी भांडणारी,
थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी,
मस्ती करणारी एक बहीण असते,
जी सगळ्या भावांना हवीहवीशी असते
कुठल्याच नात्यात नसेल इतकी ओढ आहे,
तुझे माझे नाते जणू अजरामर आहे
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला
श्रावण, लाख लाख शुभेच्छा तुम्हाला
आज आहे बहीण- भावांचा पवित्र सण
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे,
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे,
राखीशिवाय काही नाही माझ्याकडे,
म्हणूनच रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे,
हीच आहे माझी इच्छा

--LEENAL GAWADE
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================