छत्रीची प्रेम कविता-बरसत्या पावसात, भिजल्या रात्री, चिंब भिजूया, नकोय छत्री-B

Started by Atul Kaviraje, August 31, 2023, 11:01:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, बरसत्यI पावसातल्या छत्रीची एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "छतरी न खोल बरसात में, भीग जाने दे भीगी रात में"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही पाऊस थांबलेली, हवाही थांबलेली अशी थोडीशी निरुत्साही अशी गुरुवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( छतरी न खोल बरसात में, भीग जाने दे भीगी रात में )           
--------------------------------------------------------------

               "बरसत्या पावसात, भिजल्या रात्री, चिंब भिजूया, नकोय छत्री"
              -----------------------------------------------------

या पावसाने मला चारी बाजुंनी भिजवलंय, न्हाऊ घातलंय
तोही तुझ्यासारखाच द्वाड निघालाय, भिजविण्यात काही कसर नाही सोडलीय
अंगात माझ्या थंडीचं भरलीय जणू, अंग थरथर कापू लागलंय,
असा पहIत नको उभा राहूस, निकट ये प्रिया, तुझ्या प्रियेला प्रेम-ज्वर आलाय

आता तुझं मी काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही
अस मला तू बोलण्यात गुंगवू नकोस, मी तुझं मुळीच ऐकणार नाही
लवकरच या थंडीचा काही उपाय शोध, माझी थंडी घालव,
अन्यथा मलाही येईल ज्वर, जवळ घेऊन माझ्या जवानीचा ज्वIर मालव

ये जवळ ये, मला कवेत घे, अजूनी का इतका दूर आहेस ?
ये समीप ये, मला मिठीत घे, ब्रह्मचर्याचे का तू व्रत घेतले आहेस !
आज या छत्रीची नव्हे तर मला तुझी गरज आहे, तू मला हवा आहेस, 
आता अंतर नको ठेवूस, ही दूरी का अजून, साजणा, तू माझा आहेस

आता मन माझ्या काबूत नाही, ही दूरी सहन होत नाही
मला असं तडपत ठेवतोस, तुला माझी दया कशी येत नाही
इतका बेदर्दी होऊ नकोस, माझा दर्द समजून घे, बेहया तू साजणा,
माझं मन बेचैन होतंय, बेलगाम होतंय, माझी मजबुरी उमजून घे, बेदील तू रमणI

बरसत्या पावसात, भिजल्या रात्री
चिंब भिजूया, नकोय छत्री
मला आहे तुझ्या मिठीचाच आधार,
चल लवकर, तू करून घे खात्री

बरसत्या पावसात, भिजल्या रात्री
चिंब भिजूया, नकोय छत्री
तुझ्या प्रेमात इतकं नखशिखांत भिजव मजला,
तुझीच गोड स्वप्ने पडतील मला प्रत्येक रात्री

     प्रिये, मला समजतोय तुझा दर्द, मी जाणतोय तुझं दुःख
     सजणे, तुझं मन मला आर्जवतय, विनवतय सारखं सारखं
     मीही तुझ्यावर इतकच प्रेम करतो, माझं प्रेम नाही ग पारखं,
     हेही मी जाणतोय, माझ्या येण्याने, माझ्या असण्याने तुला मिळेल सुख

     परंतु, सखे मी आहे हनुमानाचा एक परमभक्त
     मी शनिवारचे व्रत पाळलंय, माझं व्रत आहे अति सख्त 
     आज शनिवार आहे, माझं परम दैवत मारुतीचा आहे वIर,
     आज तरी पIळू दे मला माझं व्रत, अन्यथा हनुमंत कोपेल माझ्यावर फार

     पावसात मलाही भिजायला आवडत, मलाही आनंद होतो
     मीही लहान मुलासारखा नाचतो, बागडतो, जेव्हा पाऊस पडतो
     हेही सांगायला नको, मीही तुझ्यावर निस्सीम प्रेम करतो,
     पण आज मला जरा लांबच ठेव, मी तुझी मिनतवारी करतो

     आजच्या दिवशी मला क्षमा कर, आजच प्रेम आपण उद्याला ठेवूया
     उद्या आहे सुट्टीचा वIर, रविवार, उद्या आपण भरपूर प्रेम करूया
     तोवर भिजू नकोस, ही छत्री उघड, आज तिचाच घे सहारा,
     तुझ्या हाती मी काही येणार नाही आज , तुझं काहीच ऐकणार नाही, या प्रहरI

     बरसत्या पावसात, भिजल्या रात्री
     चिंब नको भिजूस, उघड ती छत्री
     नेमेचि येतो हा पावसाळा अन या भिग्या भिग्या रात्री,
     तुझे माझे प्रेम नेहमीच बहरेल, या अखंड पावसाच्या रात्री

     बरसत्या पावसात, भिजल्या रात्री
     चिंब नको भिजूस, उघड ती छत्री
     ही छत्रीचं आपल्या दोघांना जवळ करतेय,
     आपल्या प्रेमाची पुन्हा नवीन सुरुवात होतेय

बरसत्या पावसात, भिजल्या रात्री
चिंब भिजूया, नकोय छत्री
     बरसत्या पावसात, भिजल्या रात्री,
     चिंब नको भिजूस, उघड ती छत्री

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.08.2023-गुरुवार.
=========================================