40 PLUS

Started by बाळासाहेब तानवडे, October 26, 2010, 07:28:33 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे


[/color]

40 PLUS

जीवन चाळिशीच्या समीप येते.
आयुष्याला हवे तसे स्थैर्य लाभते.
भौतिक सुखांची बरसात असते.
कौटुंबिक सौख्याची खैरात राहते.

पण विविध व्यसनांच्या अतिरेकाने.
जबाबदाऱ्यांच्या सतत ताणाने.
योग्य निद्रेच्या अभावाणे.
शरीराचे मग चाले रडगाणे.

कधी ह्र्दयाची धडकन चढते.
कधी शर्करेची मर्जी नडते.
सांधेदुखीची धाडच पडते.
भविष्याची मग चिंता गढते.

विविध डॉक्टरांचे उंबरे झीजतात.
विविध रीपोर्टसचे ढिगच पडतात.
बिलांची किंमत वाढत जाते.
पण हाती शेवटी शून्य येते.

या सर्वांचा नाद सोडावा.
सकस आहार - विहार करावा.
'योग' अभ्यासाची सांगड घालून,
प्राणायाम - ध्यानाशी संग धरावा.

हे नित्य -नियम ना भंग करावे.
आळसाशी मनाविरुद्ध जंग करावे.
सकारात्मक विचारांच्या साथीने,
आपल्या अमूल्य जीवनात, खुशीचे सप्त रंग भरावे.

कवी : बाळासाहेब तानवडे

©बाळासाहेब तानवडे २६/१०/२०१० 


http://marathikavitablt.blogspot.com/
    http://hindikavitablt.blogspot.com/

MK ADMIN


amoul

kya bat hai mast mast!!

बाळासाहेब तानवडे

....धन्यवाद मित्रानो ...........

santoshi.world


बाळासाहेब तानवडे

धन्यवाद संतोषीजी .