मनाचा पसारा

Started by शिवाजी सांगळे, September 04, 2023, 01:10:27 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मनाचा पसारा

कितीदा आवरावा...मनाचा पसारा
असे त्यावर आता विचारांचा पहारा

सोसता सोसेना अतीव भार तयांंचा
म्हणून लागतो घ्यावा नशेचा सहारा

क्षणिक समाधान,कोरडाच दिलासा
नशे ठायी असतो का काही उबारा?

दिमतीस सारेच शोध बोध आपल्या
तंत्रज्ञानाचा कुठवर करशील पुकारा

कोसळलेत आजवर कित्येक येथले
ढासळतो कधीतरी उभालेला मनोरा

उघडून डोळे नेहमी पहावे सभोवती
नेहमीच रम्य असतो फसवा नजारा

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९