पाऊस सर्वांसाठी

Started by शिवाजी सांगळे, September 05, 2023, 06:11:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पाऊस सर्वांसाठी

शहारते तरारते अंग प्रत्यांग झाड झुडूप वेलींचे
सुख समाधान म्हणावे की भाग्य परस्पर भेटीचे

तापली त्रासलेली धरणी, जेव्हा ओलावून जाते
सुखावती पाने फुलं जशी दव थेंबाची भेट होते

गडगडती मेघ सावळे दाखवित साऱ्यांना भीती
येतांना कधीतरी करावा गोंधळ ही कसली नीती

वारा सैरभैर ओलेता उंडारतो गल्लीबोळांमधून
कोसळत्या पावसाला सुद्धा देतो सहज भंडावून

लपंडाव नभी अन् शहरात चाले विजेचा जोरात
कळेना जनतेला खरोखर वागते कोण तोऱ्यात?

असुदे कसेही, आम्ही सोसू काही काळ हा त्रास
सर्वांसाठी नेमाने, तु रे देवा, पाठवित जा पाऊस

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९