श्रीकृष्ण जयंती-लेख-2

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:06:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया एक महत्त्वाचा लेख.

        कधी आहे श्री कृष्ण जन्माष्टमी? येथे पाहा तिथी, पूजा मुहूर्त आणि शुभ योग--

     श्रीमद भागवत पुराणानुसार श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, वृषभ राशी आणि बुधवारी झाला. यंदाची जन्माष्टमी विशेष आहे. कारण यावेळी कृष्ण जन्माष्टमी बुधवारीच साजरी केली जाणार आहे. परंतु जन्माष्टमीच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. यंदा जन्माष्टमी 6 सप्टेंबरला साजरी करावी की 7 रोजी हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

     दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्री कृष्ण जन्माष्टमी किंवा श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म या दिवशी रोहिणी नक्षत्रात झाला होता. या वर्षी कृष्ण जन्माष्टमी दोन अतिशय शुभ योगांवर आली आहे. परंतु कृष्ण जन्माष्टमी 6 सप्टेंबरला साजरी करायची की 7 सप्टेंबरला असा भ्रम अनेक भाविकांमध्ये आहे. याबाबत आपण या लेखातून सविस्तर जाणून घेणार आहोत.

              कृष्ण जन्माष्टमी 2023 तारीख--

     यावर्षी रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी जन्माष्टमीच्या रात्री येत आहेत. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमी 6 सप्टेंबरला साजरी करावी की 7 सप्टेंबरला याबाबत भाविकांमध्ये संभ्रम आहे. द्रीक पंचांगानुसार कृष्ण जन्माष्टमी सलग दोन दिवस येत आहे. अष्टमी तिथी 06 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 15:37 वाजता सुरू होईल आणि 07 सप्टेंबर रोजी 4:14 वाजता संपेल. त्यामुळे दोन्ही दिवशी कृष्ण जष्म जन्माष्टमी साजरी केली जाईल.

             कृष्ण जन्माष्टमी 2023 शुभ मुहूर्त--

     या वर्षी जन्माष्टमीसाठी रोहिणी नक्षत्र 6 सप्टेंबर रोजी सकाळी 09:20 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10:25 पर्यंत चालेल. रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी रात्री एकाच वेळी असल्याने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव 6 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल.

            कृष्ण जन्माष्टमी 2023: पूजा मुहूर्त--

     श्री जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 6 सप्टेंबर रोजी रात्री ११:५७ वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 12.42 पर्यंत लाडू गोपाळांची जयंती व पूजा चालेल. पूजेचा अवधी 46 मिनिटांचा असेल.

             शुभ योगांवर कृष्ण जन्माष्टमी--

     या वर्षी कृष्ण जन्माष्टमी दोन अतिशय शुभ योगांवर आली आहे. यावर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग राहील. हा एक शुभ दिवस आहे. या दिवशी भक्तांच्या सर्व इच्छा श्री कृष्ण पूर्ण करतात अशी मान्यात आहे. या योगात केलेले सर्व कार्य भक्तांना शुभ आशीर्वाद देते असे मानले जाते. रवि योग सकाळी 06:01 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 09:20 पर्यंत राहील.

           जन्माष्टमी 2023 उपवासाची वेळ--

     श्रीकृष्णाच्या जन्मानंतर जन्माष्टमीचा उपवास केला जातो. या वर्षी भाविकांना रात्री १२.४२ नंतर जमष्टमीचा उपवास करता येईल. तसेच दुसर्‍या दिवशी सूर्योदयानंतर जन्माष्टमी साजरी केली तर 7 सप्टेंबर रोजी सकाळी 06:02 वाजल्यापासून भक्त ती साजरी करू शकतात.

              कधी आहे दही हंडी ?--

     श्री कृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दही हंडी साजरी केली जाते. यंदा 7 सप्टेंबर गुरुवारी दही हंडी उत्सव साजरा केला जाणार आहे.

--Edited by: Chandrakant Jagtap
-------------------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाईम्स नाऊ मराठी.कॉम)
                  ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================