श्रीकृष्ण जयंती-निबंध-4

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:11:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया कृष्ण जन्माष्टमी वर निबंध.

              मंदिरांची करण्यात येणारी सजावट--

     ज्या दिवशी श्री कृष्णाचा जन्म झाला आहे, त्या दिवशी मंदिरे खास सजावट केलेली असतात. जन्माच्या दिवशी, संपूर्ण दिवस उपवास ठेवतात. या दिवशी मंदिरात भजन कीर्तन गायली जातात आणि श्री कृष्णाला पाळण्यात बसवून पाळणा म्हणतात.

     या दिवशी रासलीला देखील आयोजित केली जाते. श्री कृष्ण जन्माष्टमी दिवशी, प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात. मंदिरात एक पाळणा बांधला जातो. त्या पाळण्यात कृष्णाला ठेवतात. इतर खेळणी कृष्णाभोवती ठेवली जातात.

     जन्माष्टमी दिवशी मुले खूप उत्साही असतात कारण त्यांना अनेक प्रकारचे खेळणी खरेदी करून पाळणा सजवावा लागतो. कृष्णालीला देखील बऱ्याच ठिकाणी आयोजित केली जाते.

     श्री कृष्ण मंदिर सजवण्यासाठी तीन-चार दिवस आधी सुरुवात केली जाते. जन्माच्या दिवशी मंदिराचे सौंदर्य एकदम खुलून उठते. मंदिरे रंगीत बल्बने सजली असतात.

     या दिवशी, लोक सुद्धा मंदिराची कामे पूर्ण करण्यात मदत करतात. जन्माच्या दिवशी मंदिरात अशी गर्दी असते की सुरक्षेसाठी पोलिस, सेवक लोकांना मंदिराबाहेर आपले काम जबाबदारीने पार पाडावे लागते.

              संदेश--

     या दिवशी सर्व लोक उपवास ठेवतात परंतु कोणताही देव आपल्याला सांगत नाही की आपण माझ्यासाठी उपवास पकडावा. फक्त तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार देवाची पूजा केली पाहिजे.

     जेव्हा जग दु:ख, पाप, व्याभिचार आणि भ्रष्टाचार वाढवते तेव्हा ते दूर करण्यासाठी काही महान शक्ती जन्माला येते. म्हणूनच माणसाने नेहमी सत्यात गुंतले पाहिजे. या कारणास्तव आपण श्री कृष्णाने दिलेले संस्कार स्वीकारले पाहिजेत.

     तर हा होता कृष्ण जन्माष्टमी वर मराठी निबंध, मला आशा आहे की आपणास कृष्ण जन्माष्टमी वर मराठी निबंध (Krushna Janmashtami essay आवडला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर हा लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

--by Marathi Social
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी सोशल.कॉम)
                    --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================