श्रीकृष्ण जयंती-माहिती-1

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:23:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती.

              गोकुळाष्टमी विषयी संपूर्ण माहिती--

     गोकुळाष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या जन्मदिवशी दहीहंडी सारखे कार्यक्रम साजरे केले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावांनी बोलावले जाते. जसे की गोविंद, बाल गोपाल, कान्हा, गोपाल केशव हि सर्व श्रीकृष्णांची प्रसिद्ध नावे आहेत. गोकुळाष्टमी ही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवसापासून, हिंदू द्वारा प्रत्येक वर्षी  साजरी केली जाते.

     हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सृष्टीचे पालनकर्ता म्हणणारे श्रीहरी विष्णूचे अठरावे अवतार प्रभु श्रीकृष्ण आहे आणि कृष्णाच्या जन्मदिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते. श्रीकृष्णाबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या भुतलावर म्हणजे पृथ्वीवर एक साधारण माणसाचा जन्म घेतला आणि श्रीकृष्णाचा जन्म हा धर्माचे रक्षण करण्यासाठी झाला होता.

     त्यामुळे भारतामध्ये हजारो वर्षांपासून गोकुळाष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोकुळाष्टमी भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाचे पूजन करून केले जाते. काही ठिकाणी भक्ती संगीत गायली जाते. तर काही ठिकाणी कृष्णाच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक घातला जातो.

              गोकुळाष्टमी चे महत्व:--

     कृष्णाचा जन्म दिवस श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत झाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. अष्टमीच्या दिवशी काही लोक व्रत सुद्धा करतात या दिवशी एकभक्त राहून पांढर्‍या तिळाचा कल्प अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर फुलं, पाकड्यांनी सुशोभित करतात व त्या स्थानी देवकीचे सुतीकारागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात व बाजूला यशोदा व तिची नवजात कन्या, वसुदेव नंद यांच्या मूर्ती बसवतात.

     सप्तमीच्या मध्यरात्री सुधीरभूत होऊन संकल्प करतात व सहपरिवार कृष्णाची पूजा करतात. अष्टमीच्या दिवशी देवालाही फराळ, नैवेद्य दाखवतात. गोपाल म्हणजे कायद्याचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मो- उत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. यामध्ये काला म्हणजे एकत्र मिळवणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ असतो.

     कृष्णा हा फार प्रिय होता. असे मानले जाते, की श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर काला तयार करत असत व वाटून खात असत. गोमंतकाळातील काल्याला गवळण काला सुद्धा म्हटला जातो आणि हे एक मिश्रण पौष्टीक आहार म्हटल्या जाते, म्हणूनही गोकुळाष्टमीचे महत्व आहे. कोकणात व महाराष्ट्रात उत्सवा निमित्त दहिकाला होतो. या ठिकाणी ही हंड्या फोडत, काही ठिकाणी गोपाळकाला होतो. गोकुळाष्टमीचे एक व्रतही सांगितले असून ते केल्याने संतती, संपत्ती व वैकुंठ लोक यांची प्राप्‍ती होते. असे महत्त्व आपल्याला दिसून येते.

--प्रमोद तपासे
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                     -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================