श्रीकृष्ण जयंती-श्री कृष्ण जन्माष्टमी पाळणा

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:28:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्री कृष्ण जन्माष्टमी पाळणा.

    श्री कृष्ण जन्माष्टमी पाळणा मराठी | Shri Krishna Janmashtami palna--

पहिल्या दिवशी जन्मले बाळ 
कळस सोन्याचा देते डहाळ
कृष्ण जन्मला कंसाचा काळ
जो बाळा जो जो रे जो||१||

दुसऱ्या दिवशी दुसरा रंग
रूप सावळे गोरस रंग
जसा झळकतो आरस्याचा भिंग
जो बाळा जो जो रे जो||२||

तिसऱ्या दिवशी आनंद मोठा
सिता सावित्री बायांनो उठा
खारीक खोबरं साखर वाटा
जो बाळा जो जो रे जो||३||

चवथ्या दिवशी बोलली बाई
अनुसयेने वाजवली टाळी
कृष्ण जन्मला यमुना स्थळी
जो बाळा जो जो रे जो||४||

पाचव्या दिवशी सटवाई चा वेढा
लिंबू नारळ देवीला फोडा
तान्हा बाळाची दृष्ट गं काढा
जो बाळा जो जो रे जो||५||

सहाव्या दिवशी कलीचा मारा
राधा कृष्णाला घालती वारा
चला यशोदा आपुल्या घरा
जो बाळा जो जो रे जो||६||

सातव्या दिवशी सटवीचा महाल
तेथे सोनेरी मंडप लाल
यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोलं
जो बाळा जो जो रे जो||७||

आठव्या दिवशी अटकीचा थाट
भुलल्या गवळणी तिनशेसाठ
श्री कृष्णाची पाहतात वाट
जो बाळा जो जो रे जो||८||

नवव्या दिवशी नववीचा खंड
तान्ह्या बाळा ने घेतला छंद
वासुदेवाचा सोडवावा बंध
जो बाळा जो जो रे जो||९||

दहाव्या दिवशी दहावीची रात
तेहतीस कोटी देव मिळुन येती
उतरुन टाकती माणिक मोती
जो बाळा जो जो रे जो||१०||

अकराव्या दिवशी नारद बोले
देवा तुम्ही हो किती झोपले
मथुरा नगरीत देवकीचे हाल
जो बाळा जो जो रे जो||११||

बाराव्या दिवशी बाराचे नारी
पाळणा बांधीला यशोदा घरी
त्याला लावली रेशमी दोरी
जो बाळा जो जो रे जो||१२||

तेराव्या दिवशी बोलली बाळी
श्री कृष्ण जन्मला यमुना स्थळी
गवळणी संगे लावितो खळी
जो बाळा जो जो रे जो||१३||

चौदाव्या दिवशी तोफा गर्जती
शंकर पार्वती नंदीवर येती
बाळाच्या डोळ्यात काजळ घालती
जो बाळा जो जो रे जो||१४||

पंधराव्या दिवशी नीबत वाजे
श्रीकृष्णावरती घातला साज
यशोदा मातेला आनंद आज
जो बाळा जो जो रे जो||१५||

सोळाव्या दिवशी सोहळा केला
गुरु महाराज विद्या बोलला
श्री कृष्णाचा पाळणा गायीला
जो बाळा जो जो रे जो||१६||

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीदुनिया.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================