श्रीकृष्ण जयंती-निबंध-7

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:34:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "श्रीकृष्ण जयंती"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया कृष्ण जन्माष्टमी निबंध.

             कृष्ण जन्माष्टमी निबंध 2023--

     भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनानिमित्त जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. प्राचीन कथांनुसार श्रीकृष्णाची जन्म मथुरा नगरी मध्ये झाला . भाद्रपद कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी कंसाच्या तुरुंगात देवकीचा आठव्या मुलाच्या रूपात जन्म झाला होता . या दिवशी श्रीकृष्णाचे भक्त आशीर्वाद मिळवण्याकरता उपवास करतात,आणि पूजाअर्चना करतात .

     हिंदू धर्मात अनेक सण-उत्सव आहेत की सारे वर्ष कसे समजते हे कळत सुद्धा नाही . भारतीय संस्कृतीने या गुणांचा गौरव केला आहे . त्यात कोणत्याच प्रकारचा भेदभाव ठेवलेला नाही. पशुपक्षी, प्राणी यांच्या गुणांचा गौरव करून त्यांना सन्मानित केले आहेत . अशा या सणांमध्ये स्त्रियांचा सहभाग जास्त असतो . परंतु गोकुळाष्टमी व दहीहंडी हा मुलांचा व पुरुषांचा उत्सव आहे . भगवान श्रीकृष्ण हे युगा युगा पासून आपल्या विश्वाचे केंद्र आहेत . श्रावण वद्य अष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्म झाला .

     श्रीकृष्ण हे देवकी आणि वासुदेव यांचे आठवे मूल होते . त्यावेळेस मथुरा नगरी चा राजा कंस होता तो खूप छळ करणार होता . त्याचा छळ करणे दिवसेंदिवस वाढत होते . एक दिवशी आकाशवाणी झाली त्या आकाशवाणीच्या माध्यमातून देवकीचा आठवा मुलगा म्हणजेच भगवान श्रीकृष्ण कंसाला ठार मारील अशी आकाशवाणी झाली . हे ऐकून कंसाने आपली बहिण देवकी आणि तिचा नवरा वासुदेव यांना काल कोठडी मध्ये ठेवले . कंसाने देवकी मातेच्या सातही मुलांचा वध केला.

     जेव्हा देवकी मातेने श्रीकृष्णाचा जन्म दिला तेव्हा रात्रीच्या अंधारात आणि खूप मोठा पाऊस येत असताना . वसुदेव श्रीकृष्णाला गोकुळात घेऊन गेले. श्रीकृष्णाच्या पालन-पोषण यशोदा माता आणि नंद बाबा यांच्या देखरेखीखाली झाला. या दिवसापासून श्रीकृष्णाचा जन्माचा आनंदात जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरी केली जाते. या उत्सवाच्या वेळी पूजा ,प्रवचन ,भजन ,कीर्तन मंत्रघोष अशा विविध कार्यक्रमांनी दिवस-रात्र कसे जाते हे कळतच नाही . गोविंदा आला रे आला म्हणून दहीहंड्या फोडल्या जातात .

     कृष्ण गोकुळात दह्या-दुधात वाढला . गोरगरीब लोकांच्या व सवंगड्यांच्या बरोबर खेळला . सुदामाचे पोहे आवडीने खाल्ले म्हणून नवमीला दहीपोहे यांचा प्रसाद वाटला जातो . गोविंदा रे गोपाळा च्या तालावर तरुण मुले नाचत गाजत मिरवणूक काढतात . भगवद्गीता हे जीवनाचे सार आहे पाच हजार वर्षे होऊन सुद्धा श्रीकृष्ण विसरला जात नाही

             निष्कर्ष ( Conclusion)--

     ह्या पोस्ट मध्ये आपण कृष्णा जन्माष्टमी मराठी निबंध म्हणजेच krishna janmashtami essay in marathi बद्दल चर्चा केली .krishna janmashtami in marathi म्हणजेच gokulashtami information in marathi हा निबंध 100 , 200आणि 300 शब्दात जाणून घेतले . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता . व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत नक्की शेयर करा.

--by Pritam Sansare
-----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ज्ञान जेनीक्स.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================