श्रीकृष्ण जयंती-निबंध-8

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 05:36:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया कृष्ण जन्माष्टमी निबंध.

     मित्रांनो आज "कृष्णा जन्माष्टमी निबंध मराठी" या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

"दहयात साखर साखरेत भात
उंच दहीहंडी उभारून
देऊ एकमेकांना साथ
जोशात साजरा करू श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण"

     श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस श्रावण महिन्यात वय अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्यादिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो.

     श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो. रात्री बारा वाजता श्रीकृष्णाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये ठेवून त्याला दही-दुधाचा प्रसाद दाखवला जातो श्रीकृष्ण जन्मावर आधारित पाळणे आणि गवळण गाऊन श्रीकृष्णाची पूजा आणि आरती केली जाते.

     हा जन्मोत्सव भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली जाते. या दिवसाला गोपाळकाला असेही म्हटले जाते.

     यादिवशी बालगोपालांचा गट दहीहंडी फोडण्यासाठी तयारच असतो. दहीहंडीसाठी आजूबाजूच्या मंडळींकडून वर्गणी जमा केली जाते. या वर्गणीतून मोठी मातीची हंडी आणली जाते. या हंडीत दही भरले जाते. हंडीच्या बांधलेल्या मजबूत दोराला हंडीच्या दोन्ही बाजूंनी केळी आणि इतर पाच फळे बांधली जातात.

     फुलांच्या माळा तसेच फुगे लावले जातात. हंडीभोवती फुलांचे हार, रूपयांच्या नोटा बांधल्या जातात. हंडीला अतिशय सुंदररीत्या सजवले जाते. अशी पूर्वतयारी झाली की वेळ येते प्रत्यक्ष दहीहंडी फोडण्याची.

"राधेची भक्ती, बासरीची गोडी,
यशोदा- देवकी मैयामौरी,
श्रीकृष्ण-सुदामाची मैत्री न्यारी,
लोण्याचा स्वाद, सोबतीला गोपिकांचा रास,
मिळून साजरा करू श्रीकृष्णजन्माष्टमीचा दिवस आज"

गोविंदा आला रे आला'
गोकुळात आनंद झाला.

     हे गाणं म्हणत बालगोपाल ढोल, लेझीमच्या गजरात गुलाल उधळत दहीहंडी फोडण्यासाठी येतात. दहीहंडी जमिनीपासून उंचावर बांधलेली असल्यामुळे बालगोपाल ऐकमेकांच्या खांद्यावर चढून मानवी मनोरा रचतात व दहीहंडी फोडतात.

     या दिवसाचा आनंद लुटतात. आज दहीहंडी फोडणारी अनेक गोविंदा मंडळे आहेत दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या मंडळाना लाख-लाख रुपयांची बादीसे लावली जातात. जास्तीत जास्त थर लावण्याकडे भर दिला जातो मात्र त्यामुळे जीवाचे नुकसान होण्याची शक्यता असते.

     सण साजरा करताना त्याला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर आज आपण श्रीकृष्णाच्या भक्तीत दंग होऊन जावूया आाम अतिउत्साहात नियमांचा भंग होणार नाही याची काळजी घेऊया.

विसरून सारे मतभेद लोभ,
अहंकार दूर सोडा
सर्वधर्मसमभाव मनात जागवूया
आपुलकीची दहीहंडी फोडूया."

--श्रीकृष्णाचा जन्म कधी आणि कुठे झाला?
--श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात वय अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला.

--श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कोणत्या तिथीला केली जाते?
--श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा श्रावण कृष्ण अष्टमी तिथीला केली जाते

--by Nibandh Marathi
------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-निबंधमराठी.इन)
                       -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================