श्रीकृष्ण जयंती-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 06:12:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "श्रीकृष्ण जयंती"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

     नमस्कार मित्रांनो आज म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म दिवस (गोकुळाष्टमी) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अतिशय छान शुभेच्छा संदेश मराठी. खालील लेखात दिलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांना शोशल मिडिया वर शेअर करू शकता.

           श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या-गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा.. कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰
गोकुळामध्ये होता ज्याचा वास,गोपिकांसोबत ज्याने रचला रास, यशोदा, देवकी ज्याची मैय्या,तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या, गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🎯
ढगांच्या आडून चंद्र हासला,आकाशी ता-यांचा रास रंगला,कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा !

💠
हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा जो जो जो जो रे,श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔯
नंद किशोरा ,चित्त चकोरा गोकुळ कान्हा मनमोहन तु कृष्णा कृष्णा हरे कृष्णा,राधे कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा..सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

🔵
राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी लोणी चा स्वाद आणि, गोपींचा रास सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔴
हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की.. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🌐
नंद के घर आनंद ही आनंद भयो,जो नंद के घर गोपाल आयो,जय हो मुरली धर गोपाल की, जय हो कन्हैया लाल की... कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

♦️
दह्यात साखर आणि, साखरेत भात, दही हंडी उभी करूया,देऊया एकमेकांना साथ,फोडूया हंडी लावूनच उंच थर,जोशात करूया दही हंडीचा थाट...कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰
ही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी नाव अनेक पण उत्साह तोच, जन्माष्टमीच्या मनःपू्र्वक शुभेच्छा !
=========================================

--DRx Chakradhar.S.More
-----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमहिला.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================