श्रीकृष्ण जयंती-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 06:15:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "श्रीकृष्ण जयंती"
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

          श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या-गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
🎯
नंद के घर आनंद ही आनंद भयो,जो नंद के घर गोपाल आयो,जय हो मुरली धर गोपाल की,जय हो कन्हैया लाल की...सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

💠
मित्रांनो, थराला या!नाहीतर, धरायला या!! आपला समजून, गोविंदाला या!!! श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!

🔯
कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख, मिळून कृष्ण भक्तीत सारे हरी गुण गाऊ एकत्र..कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔵
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं..गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔴
ढगांच्या आडून चंद्र हासला, आकाशी ता-यांचा रास रंगला,कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🌐
कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं धाम, अशा श्री भगवान कृष्णाला आमचा शतश: प्रणाम गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰
जसा आनंद नंदच्या घरी आला तसा तुमच्या आमच्याही घरी येवो प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो,जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

♦️
लय झाली दुनियादारी,खूप बघितली लय भारी आता फक्त आणि फक्त करायची दहीहंडीचा तयारी. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

🎯
जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडुन तुम्हांला मागावे लागेल,आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल,श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
=========================================

--DRx Chakradhar.S.More
-----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमहिला.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================