श्रीकृष्ण जयंती-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा-8

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 06:26:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "श्रीकृष्ण जयंती"
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

     दहीहंडीचा आनंद हा वेगळाच असतो. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी तुम्ही खास दहीहंडी शुभेच्छा (Dahi Handi Wishes) संदेश पाठवू शकता.  दहीहंडीची गाणी ऐकूनही तुम्हाला हा दिवस आनंदात घालवता येईल.

=========================================
दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

तुझ्या घरात नाही पाणी,
घागर उताणी रे गोपाळा,
गोविंदा तान्ह्या बाळा,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

विसरुनी सारे मतभेद
लोभ- अहंकार सोडा रे
सर्वधर्मसमभाव जागवून
आपुलकीची दहीहंडी फोडा रे,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दे दंग
अति उत्साहात अजिबात करु नका नियमभंग,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

आला रे आला गोविंदा आला,
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा, दहीहंडीच्या शुभेच्छा!
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================