श्रीकृष्ण जयंती-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा-11

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 06:31:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "श्रीकृष्ण जयंती"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

               हॅपी जन्माष्टमी स्टेटस (Happy Janmashtami Status)--

       जन्माष्टमीच्या दिवशी खास स्टेटस ठेवून जर तुम्ही हा आनंद वाटणार असाल तर तुमच्यासाठी खास जन्माष्टमी स्टेटस (Happy Janmashtami Status In Marathi) या स्टेटसमधून तुम्हाला जनजागृतीही करता येईल.

=========================================
एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा
सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या
दहीहंडी सणाच्या शुभेच्छा!

भगवान कृष्णाची शिकवण घेऊन करुया
मानवी जगाचे कल्याण,करुया दहीहंडीच्या शुभेच्छा!

दहीकाल्याचा उत्सव मोठा नाही आनंदाला तोटा, दहीहंडीच्या शुभेच्छा!

दही, लोणी ज्याची आवड... आज आहे त्याचा जनमदिवस... गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

आजच्या या पवित्र दिनी भगवान कृष्णाने घेतला जन्म
आणि सुरु झाले कलियूग... त्याच्या चरणी नतमस्तक होऊन
घेऊया त्याचा आशीर्वाद, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

आज गोकुळात रंग खेळतो हरी.... राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
रंगात रंग तो शाम रंग पाहण्या नजर भिरभिरते... गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

शून्यालाही येते किंमत त्याच्यापुढे राहा फक्त एकत्र उभे, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

गोविंदा रे गोपाळा.... गर्दी टाळा आणि सोशल डिस्टंसिंग पाळा, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कृष्ण मुरारी नटखट भारी... गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================